नागरिकांनो सावधान.. बंद घरावर चोरट्यांचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 05:00 AM2021-10-08T05:00:00+5:302021-10-08T05:00:07+5:30

घर मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हा डल्ला मारला. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बालाजी पार्क येथील  अरविंद लक्ष्मण राठोड   हे घरगुती कामानिमित्त  बाहेरगावी गेले होते. घर मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी  दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील एका रूममधील पेटीत ठेवलेल्या सोन्या-चांदीचे दागिने, दोन तांबडे गुंड, गंगाळ, पितळेचे कोपर, एम. आय. कंपनीचा जुना वापरता टीव्ही तसेच डिश बॉक्स असा  ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

Citizens beware .. thief's eye on closed house | नागरिकांनो सावधान.. बंद घरावर चोरट्यांचा डोळा

नागरिकांनो सावधान.. बंद घरावर चोरट्यांचा डोळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सण-उत्सवाच्या काळात नागरिकांची बाहेरगावी जा-ये सुरू असते. नेमक्या या संधीचा फायदा चोरट्यांकडून उठविला जात आहे. नेर येथील लक्ष्मीनगरमधून चोरट्यांनी ८५ हजारांचा ऐवज लंपास केला. तर पुसदनजीकच्या कवडीपूर ग्रामपंचायत हद्दीतून घर फोडून ६७ हजारांचा ऐवज पळविण्यात आला. विशेष म्हणजे या दोनही घटना घरमालक बाहेरगावी गेल्यानंतर संधी साधून केल्या गेल्या आहेत. 
नेर शहरातील महालक्ष्मीनगर येथील एका प्राध्यापकाचे घर फोडून ८५ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
महालक्ष्मीनगर येथील प्रा. निलेश रामदास मोकाळे हे वर्धा येथे एका लग्न सोहळ्यासाठी परिवारासह गेले होते. ही संधी साधत मंगळवारी रात्री चोरट्यांनी घरातील कुलूप कोंड्यासह बाहेर काढून आतमध्ये प्रवेश केला व १२ ग्रॅम सोन्याची चेन, तीन ग्रॅमचे कानातील दागिने आणि रोख १८ हजार रुपये असा एकूण ८५ हजारांचा ऐवज चोरून नेला. जुन्या दराप्रमाणे हा ऐवज ४७ हजार रुपये किमतीचा आहे. प्रा. मोकाळे हे बुधवारी सकाळी परतले असता, घरातील स्थिती पाहून चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. श्वान पथकासह पोलीस पथक घटनास्थळी आले. मात्र, अद्याप चोरांचा सुगावा लागलेला नाही. 
पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कवडीपूर ग्रामपंचायतीमधील बालाजी पार्क येथून ६७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. घर मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हा डल्ला मारला. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बालाजी पार्क येथील  अरविंद लक्ष्मण राठोड   हे घरगुती कामानिमित्त  बाहेरगावी गेले होते. घर मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी  दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील एका रूममधील पेटीत ठेवलेल्या सोन्या-चांदीचे दागिने, दोन तांबडे गुंड, गंगाळ, पितळेचे कोपर, एम. आय. कंपनीचा जुना वापरता टीव्ही तसेच डिश बॉक्स असा  ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. 

 लोहारा येथे भरदुपारी घर फोडून चार लाख पळविले
- वाघापूर बायपासवर शुभम काॅलनी येथील बंद घर भरदुपारी फोडून चोरट्यांनी रोख एक लाख १० हजार आणि दोन लाख ६१ हजारांचे सोने असा तीन लाख ८३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. शासकीय रुग्णालयातील एक्स-रे तज्ज्ञ विलास धोंडबाजी वासनिक हे कर्तव्यावर गेले होते. घरी त्यांची मुलगी व लहान मुलगा होता. ते दोघेही आरटीओ कार्यालयात लायन्सनसाठी गेले. ही संधी पाहूनच चोरट्यांनी बुधवारी दुपारी घरात प्रवेश केला. स्वयंपाकघरातील मागील दाराचा कोंडा तोडून दागिने व रोख रक्कम पळविली. या घटनेचा तपास लोहारा ठाणेदार अनिल घुघल हे करीत आहेत.

 

Web Title: Citizens beware .. thief's eye on closed house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Thiefचोर