शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

नागरिकांनो, मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करताना राहा सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 5:00 AM

पैस्याची देवाणघेवाणही मोबाईल अ‍ॅप्सद्वारे केली जाते. सोबतच छोट्या मोठ्या व्यवहारासाठी वापरात येणारे ई-व्हॅलेट (पेटीएम, गुगल-पे, फोन-पे, भीम अ‍ॅप) मोबाईल मध्येच डिटेल्ससह स्टोअर केलेले असते. त्यामुळे मोबाईलमध्ये अ‍ॅप्स डाऊनलोड करताना सतर्क असणे आवश्यक आहे. चुकीचा अ‍ॅपडाऊनलोड करणे म्हणजे चोराला तिजोरी उघडी ठेवून चोरी करण्याचे निमंत्रण देण्यासारखे आहे.

ठळक मुद्देमोबाईल दुसऱ्याच्या नियंत्रणात : बँक खात्यासह इतरही गोपनीय माहितीवर चोरट्यांचा डोळा

यवतमाळ : मोबाईलच्या प्लेस्टोअरमध्ये एका पेक्षा एक भारीअ‍ॅप्स आहेत. आता मोबाईलची रॅम (स्टोअरेज क्षमता) वाढल्यानेप्रत्येक गोष्टीचे अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा आनंद मोबाईलयुजर्स घेत आहेत. मात्र बेभान होऊल अ‍ॅप्स डाऊनलोड करणेधोक्याचे आहे. एखाद्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून फ्रॉडेस्टर (ठगणारे)तुमच्या मोबाईलचा ताबा घेऊन तुमच्या नकळत सर्व गोपनीय माहितीएका झटक्यात मिळवू शकतात. मोबाईल क्रमांकाला लिंक असलेलेबँक खाते परस्पर हाताळू शकतात. स्टेट बँकेच्या एका ग्राहकालायाच पद्धतीने पावणे तीन लाखांनी गंडा घातला.बँकेचे सर्व व्यवहार मोबाईलवरून नियंत्रित करता येतात. चालू खात्यासोबत बचत ठेव (एफडी), विमा पॉलिसी हे सर्व व्यवहार बँकेत न जाता करता येते. यामुळे तरूण पिढी बँकेत प्रत्यक्ष जाऊन रांगेत लागण्याऐवजी मोबाईलवरूनच सर्व व्यवहार करतात. पैस्याची देवाणघेवाणही मोबाईल अ‍ॅप्सद्वारे केली जाते. सोबतच छोट्या मोठ्या व्यवहारासाठी वापरात येणारे ई-व्हॅलेट (पेटीएम, गुगल-पे, फोन-पे, भीम अ‍ॅप) मोबाईल मध्येच डिटेल्ससह स्टोअर केलेले असते. त्यामुळे मोबाईलमध्ये अ‍ॅप्स डाऊनलोड करताना सतर्क असणे आवश्यक आहे. चुकीचा अ‍ॅपडाऊनलोड करणे म्हणजे चोराला तिजोरी उघडी ठेवून चोरी करण्याचे निमंत्रण देण्यासारखे आहे.लोहारा पोलीस ठाणे हद्दीत स्टेट बँकेत ग्राहकाच्या एफडीचे पैसे परस्पर काढून पावणे तीन लाखांनी गंडा घातला. या ग्राहकाने ‘एनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड केले. हे अ‍ॅप मोबाईलमध्ये येताच फ्रॉडेस्टरने त्या ग्राहकाच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस(वापर) घेतला.यामुळे फ्रॉडेस्टरचे संपूर्ण नियंत्रण ग्राहकाच्या मोबाईलवर आले. त्याने बँक खात्याची सर्व डिटेल्स मिळविली. कस्टमर आयडी मिळाला हा आयडी मिळताच फ्रॉडेस्टरने ग्राहकाची बँकेत असलेली मुदतठेव तोडली, ती रक्कम त्याच्या बचत खात्यात वळती केली. नंतर ओटीपी जनरेट करून पैसे परस्पर काढून घेतले. यावरून चुकीचा अ‍ॅपडाऊन लोड करणे किती महागात पडू शकते याची प्रचिती येते. मोबाईल प्लेस्टोअरमध्ये टेक्नीकल सपोर्टसाठी लागणारे अनेक अ‍ॅप आहेत. यापैकी एखादा अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर फ्रॉडेस्टरचे काम सोपे होते. तो न कळत तुमच्या मोबाईलचा ताबा घेऊन त्यात असलेली संपूर्ण माहिती वापरु शकतो. इतकेच काय ई-वॉलेटमधील रकमेवरही त्याला डल्ला मारणे सहज सोपे होते. आता अशा पद्धतीने फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात बँक व पोलीसही एका मर्यादेपलिकडे जाऊन मदत करू शकत नाही.या अ‍ॅप्सपासून राहावे दूरप्ले स्टोअरध्ये असलेल्या एनी डेस्क, टीमीव्हिव्हर, फिक्स स्पोर्ट, एअर ड्राईड ही टेक्नीकल सपोर्ट देणारी अ‍ॅप सध्या प्रचलित आहे. याचाच वापर करून फ्रॉडेस्टर ग्राहकांच्या पैशावर हात साफ करीत आहे.परिपूर्ण माहिती असल्याशिवाय मोबाईलद्वारे बँकींग, ईव्हायलेटचा वापर करणे टाळावे. तरच आपला पैसा व गोपनीय माहिती सुरक्षित राहू शकते.- अमोल पुरीसहायक पोलीस निरीक्षकसायबर सेल, यवतमाळ.

टॅग्स :MobileमोबाइलPoliceपोलिस