शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पर्स हिसकावून पळालेल्या दोघांना सिनेस्टाईल पकडले, ग्रामस्थांनी केला चार किमी पाठलाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 14:41 IST

खैरी बसस्थानकावरील थरार; एकाला ग्रामस्थाने तर बंदुकीच्या धाकावर पसार झालेल्यास पोलिसांनी पकडले

वडकी (यवतमाळ) : दुचाकीवर बसून निघालेल्या महिलेची बॅग हिसकावून पळणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली. गावकऱ्यांनी चार किमी पाठलाग करून एकाला पकडले, तर बंदुकीच्या धाकावर पसार झालेल्या एकाला माढळी ता. वरोरा (जि. चंद्रपूर) येथून ताब्यात घेण्यात आले. 

सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा थरारक प्रकार खैरी बसस्थानक येथे घडला हिरा लक्ष्मण लिंगडे व शुभम खिरटकर (रा. वरोरा, जि. चंद्रपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सहयोग मल्टीस्टेट कौ-ऑप बँकेच्या प्रतिनिधी असलेल्या कोसारा (ता. राळेगाव) येथील सेंट्रल बँकेत आल्या होत्या. काम आटोपून दुचाकीवर मागे बसून गावाकडे निघाल्या. खैरी गावातील गोटाडी बसस्टॉपवर दुचाकीची गती कमी होताच मागून एका दुचाकीवर (एमएच २९ एएक्स ७६५६) आलेल्यांनी या महिलेची बॅग हिसकावून पळ काढला. महिलेने आरडाओरड केल्याने बसस्टॉपवर असलेल्या युवकांनी दुचाकीने चोरट्यांचा पाठलाग केला. खैरी गावापासून चार किमी अंतरावर असलेल्या दापोरा 

नाल्याजवळ चोरट्यांच्या दुचाकीत बिघाड झाल्याने ते थांबले. पाठलाग करणारे युवक पाहून चोरटे दुचाकी सोडून पळाले. युवकांनी पाठलाग करून हिरा लक्ष्मण लिंगडे (रा. माढळी, जि. चंद्रपूर) याला पकडले. त्याचा साथीदार बंदुकीचा धाक दाखवून पसार झाला.

ग्रामस्थांनी वडकी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पकडण्यात आलेल्या हिरा लिंगडे याला दुचाकीसह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पसार झालेल्या आरोपीचा शोध वडकी पोलिसांनी सुरू केला. सहा तासानंतर दुसऱ्या आरोपीला वरोरा येथून अटक करण्यात आली. शुभम खिरटकर (रा. वरोरा, जि. चंद्रपूर), असे त्याचे नाव आहे. महिलेच्या तक्रारीवरून अटक करण्यात आलेल्या दोघांविरुद्ध कलम ३९२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

वाटमारीच्या घटनांची मालिका सुरू

यवतमाळ जिल्ह्यात वाटमारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मारेगावमध्ये डॉक्टरचे अपहरण करून लुटल्यानंतर गुन्हा उघड झाला नाही तोच आता वडकी परिसरातही लुटमारीची घटना घडली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीYavatmalयवतमाळ