शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड लाईन

By admin | Updated: October 21, 2016 02:19 IST

काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांच्या मदतीकरिता चाईल्ड लाईन-१0९८ ही संस्था कार्यरत आहे.

सल्लागार मंडळाची बैठक : बालकांची काळजी व संरक्षणयवतमाळ : काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांच्या मदतीकरिता चाईल्ड लाईन-१0९८ ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या सल्लागार मंडळाची बैठक महसूल भवनात पार पडली.चाईल्ड लाईन संस्था काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या जिल्ह्यातील बालकांच्या मदतीला धावून जाते. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टतर्फे ही संस्था चालविली जाते. संस्थेच्या सल्लागार मंडळाची बैठक अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, महिला व बालकल्याण अधिकारी अर्चना इंगोले, समाजकल्याण अधिकारी चव्हाण, शासकीय बालगृहाचे पाटील, बीएसएनएलचे प्रबंधक, माहिती कार्यालयाचे गजानन कोटुरवार उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी राऊत यांनी बैठकीत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये चाईल्ड लाईनची माहिती दर्शनी भागात लावण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले. बीएसएनएलच्या देयकावर संस्थेचा लोगो छापावा, खासगी शाळांमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी पत्र द्यावे, असे सूचित करण्यात आले. तसेच आरोग्य विभाग व शासकीय महाविद्यालयांना विशेष सूचना देण्यात येणार आहे. मुलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन शहरी भागात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिशूच्या काळजीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला विशेष सूचना देण्यात आल्या. सल्लागार मंडळाच्या बैठकीला आरोग्य, शिक्षण विभागासह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सपना लोडम यांनी संस्थेबाबत माहिती सादर केली. (शहर प्रतिनिधी)