मुख्यमंत्री फडणवीस आज पुसदमध्ये
By Admin | Updated: February 10, 2017 01:51 IST2017-02-10T01:51:22+5:302017-02-10T01:51:22+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस आज पुसदमध्ये
जाहीर सभा : जिल्हा परिषद निवडणूक
पुसद : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील नागपूर मार्गावरील प्रांगणात करण्यात आले असल्याची माहिती भाजपाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पुसद तालुक्यातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी येत आहे. मुख्यमंत्र्यांनी पुसद मतदारसंघाला अन्यय साधारण महत्व दिले असल्याने ते स्वत:हून येथे येत असल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले. यावेळी वसंतराव पाटील, विनोद जिल्हेवार, तालुकाध्यक्ष विश्वास भवरे, भारत पाटील, नगरसेवक निखिल चिद्दरवार, निरज पवार, नीळकंठ पाटील, राजू पाटील, परमेश्वर जयस्वाल, अनिरुद्ध चोंढीकर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या या सभेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून ४४ पोलीस अधिकारी, २५७ पोलीस, १७ महिला पोलीस, क्यूआरटी पथक, दोन एसआरपी पथक तैनात करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)