चेतना अभियान यात्रा पोहोचली पुसदमध्ये
By Admin | Updated: December 23, 2016 02:28 IST2016-12-23T02:28:35+5:302016-12-23T02:28:35+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत बळीराजा चेतना अभियान यात्रेचे येथील शिवाजी चौकात स्वागत करण्यात आले.

चेतना अभियान यात्रा पोहोचली पुसदमध्ये
विद्यार्थ्यांचा सहभाग : पथनाट्यातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी प्रयत्न
पुसद : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत बळीराजा चेतना अभियान यात्रेचे येथील शिवाजी चौकात स्वागत करण्यात आले. या अभियानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यापीठाचे सल्लागार सदस्य प्रा.दिलीप अलोणे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नका, असा संदेश विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून दिला. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिता नाईक, तहसीलदार संजय गरकल, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने उपस्थित होत्या. यावेळी काढण्यात आलेल्या यात्रेला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. या कार्यक्रमाला प्राचार्य गणेश पाटील, प्राचार्य एस.एम. अग्रवाल, प्रा.विवेक शिरसकार, प्रा.संजय भागवत, प्रा.जीवाणी, प्रा.महल्ले, प्रा.वडोले, प्रा.अक्षय पुंडे, प्रा.खैरे, पंकज भागवत आदींची उपस्थिती होती. विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक या यात्रेत सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जय नाईक, प्राचार्य डॉ.एच.बी. नानवाला यांच्या मार्गदर्शनात अक्षय इंगोले, नीलाक्षी तडसे, तेजस बहादुरे, स्वप्नील रोकडे, श्रेयश नाईक, सुमीत तायडे, ब्रह्मानंद जाधव, शुभम चापके, शुभम देशमुख, प्रणल नुपनर, वैभव पिंपरने, अक्षय दारोळकर, प्रियंका हरणे, देवश्री आंबेकर, ममता सदावर्ते, स्रेहल व्यवहारे व इतर स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)