शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

जिल्हा परिषदेत बदलीप्रक्रियेला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:08 IST

जिल्हा परिषदेत विविध विभागातील बदली प्रक्रियेने वेग घेतला आहे. तूर्तास सामान्य प्रशासन विभागातील ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ठळक मुद्देज्येष्ठता यादी : शिक्षक बदल्यांचा गुंता कायमच, विविध विभागांच्या याद्या तयारच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेत विविध विभागातील बदली प्रक्रियेने वेग घेतला आहे. तूर्तास सामान्य प्रशासन विभागातील ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.येत्या ३१ मे पूर्वी बदल्या करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले. त्यानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. तथापि अनेक विभागांची यादी अद्याप तयारच झाली नाही. सध्या केवळ सामान्य प्रशासन विभागाची ज्येष्ठता यादी पूर्ण झाली असून ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत तब्बल ४४० कनिष्ठ सहायक, १२२ वरिष्ठ सहायक, २४ कक्ष अधिकारी, ३८ सांख्यीकी विस्तार अधिकारी, १४० कनिष्ठ प्रशासन अधिकारी आदींचा समावेश आहे. ही यादी प्रसिद्ध झाली. मात्र शिक्षक, आरोग्य, बांधकाम, समाजकल्याण, महिला व बालकल्याण आदी विभागांच्या याद्या फायनल झाल्या नाहीत.बदलीपात्र शिक्षकांची यादी एनआयसीकडून जिल्हा परिषदेला प्राप्त होणार आहे. नंतर शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला वेग येणार आहे. त्यामुळे शिक्षकांचे लक्ष एनआयसीकडे लागले आहे. मात्र शिक्षकांच्या बदल्यांचा गुंता अद्याप कायम आहे. बदली धोरणावर शिक्षकांचे आक्षेप आहे. काही शिक्षक संघटनांनी बदल्यांविरोधात शासनाविरूद्ध रणशिंग फुंकले आहे. तथापि जवळपास १६ संघटना आमच्यासोबत असल्याने बदल्या करणारच, असा निर्धार शासनाने केला आहे. त्यामुळे शिक्षक बदल्यांकडे सर्वांचे लक्ष आहे.मुक्कामी कर्मचाºयांना कुणाचे अभय?जिल्हा परिषदेच्या काही विभागात गेल्या अनेक वर्षांपासून काही कर्मचाऱ्यांनी ठाण मांडले आहे. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात मुक्कामी आहे. मूळ नियुक्ती दुसऱ्या विभागात असलेले अनेक कर्मचारी दुसऱ्या विभागात प्रतिनियुक्तीवरही आहेत. काही कर्मचारी तर खास ‘साहेबां’नी आणले होते. ते बदलून गेल्यानंतरही असे कर्मचारी तेथेच आहे. त्यांना कुणाचे अभय आहे, याची चर्चा रंगली आहे.संघटना पदाधिकाऱ्यांची चलतीजिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या काही संघटना पदाधिकाऱ्यांची सध्या भलतीच चलती आहे. एकाच संघटनेचे अध्यक्ष, सरचिटणीस, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांनी तर संघटनेला पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडे गहाण ठेवल्यासारखी स्थिती आहे. पदाधिकाऱ्यांचे पीए आणि सामान्य प्रशासनसारख्या महत्त्वाच्या विभागात जागा बळकविण्यासाठी त्यांनी संघटनेलाच दावणीला बांधल्याचे बोलले जात आहे. त्याच संघटनेचे समान्य सभासद मात्र बदलीसाठी प्रशासनाचे उंबरठे झीजवीत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद