शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

वारज गावामध्ये साकारणार चंदन पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 9:38 PM

जिल्हा मुख्यालयापासून १५ किमीवरील वारज गावात चंदन पार्क उभे राहणार आहे. या पार्कमधून प्रेरणा घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चंदन शेतीकडे वळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वनविभागाच्या नेतृत्वात चंदन पार्कचे संपूर्ण कामकाज पार पडणार आहे.

ठळक मुद्देवनविभागाचा प्रयोग : उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना देणार सामूहिक शेतीचे धडे

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मुख्यालयापासून १५ किमीवरील वारज गावात चंदन पार्क उभे राहणार आहे. या पार्कमधून प्रेरणा घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चंदन शेतीकडे वळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वनविभागाच्या नेतृत्वात चंदन पार्कचे संपूर्ण कामकाज पार पडणार आहे.यवतमाळ-दारव्हा मार्गावर वारज गाव आहे. यवतमाळ तालुक्यातील या गावालगत वनविभागाची पाच हेक्टर जमीन आहे. यामध्ये सीताफळ, सहद, बोर आणि रानफळांची रेलचेल आहे. याच परिसरात वनविभाग चंदन पार्क साकारणार आहे.वनपर्यटन विकास योजनेतून चंदन पार्क होणार आहे. यासाठी ४५ लाख रूपयांचा निधी लागणार आहे. वनविभाग चंदनाचे रोप लावणार असून तयार होणारे रोपटे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुणे येथील चंदन तज्ज्ञ महेंद्र घागरे वनविभागाने मागणी केल्यास चंदनाची रोपे पुरविणार आहेत. चंदनाची शेती कशी करावी, अंतर किती असावे, संवर्धनासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती दिली जाणार आहे. चंदनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवे तंत्रज्ञान अवगत करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, चोरीला आळा घालण्यासाठी चंदनाच्या सामूहिक शेतीवर भर देणार आहे.त्याकरिता डेमो प्लॉटही या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे. कमी पाण्यात येणारे पीक म्हणून चंदनाची शेती फायदेशीर ठरणारी आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्य वनसंरक्षक कार्यालयाने पावले उचलली आहेत. यामुळे काही दिवसात वारज गावामध्ये चंदनाची सुंदर रोपवाटिका पाहायला मिळण्याची शक्यता आहे.लातूरमध्ये प्रयोग यशस्वीलातूर जिल्ह्यात चंदन शेतीचा प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे. चंदन वृक्षाचे पान, फांद्या आणि खोडापासूनही विविध उत्पादने तयार होतात. यामुळे लातूरमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात चंदन शेतीकडे वळत आहेत. आता यवतमाळ जिल्ह्यात चंदन शेतीचा प्रयोग करण्याच्या दृष्टीने वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहे.वनपर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून चंदन पार्क उभे केले जात आहे. ही अभिनव संकल्पना शेतकºयांना प्रेरणा देणारी ठरणार आहे.- भानुदास पिंगळे,उपमुख्य वनसंरक्षक, यवतमाळशासनाचा एक पैसाही न घेता चंदनाची रोपे मोफत वाटण्याची मोहीमच आम्ही हाती घेतली आहे. राज्यासह परराज्यातही चंदन लागवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत २५ लाख रोपांची लागवड झाली आहे. यातून प्रांत समृद्ध होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.- महेंद्र घागरे,चंदन तज्ज्ञ,विद्यापीठ सिनेट सदस्य, पुणे

टॅग्स :forest departmentवनविभागYavatmalयवतमाळ