शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

‘एसटी’तील गोंधळ थांबविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 9:49 PM

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात सुरू असलेला गोंधळ थांबविण्याचे आव्हान वरिष्ठांपुढे आहे. विविध कारणांमुळे रद्द होणाऱ्या बसफेऱ्या, वाढलेले ब्रेकडाऊन यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, शिवशाही बसचे अधिक शेड्यूल असलेल्या मार्गावर इतर बसेसचा तुटवडा आहे.

ठळक मुद्देबसफेऱ्या रद्द : प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय, ब्रेकडाऊनचे प्रमाण अनियंत्रित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात सुरू असलेला गोंधळ थांबविण्याचे आव्हान वरिष्ठांपुढे आहे. विविध कारणांमुळे रद्द होणाऱ्या बसफेऱ्या, वाढलेले ब्रेकडाऊन यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, शिवशाही बसचे अधिक शेड्यूल असलेल्या मार्गावर इतर बसेसचा तुटवडा आहे.चालक, वाहक नाही. आगारात बस शिल्लक नाही, तिकीट मशीन खराब आहे या व इतर अनेक प्रकारच्या कारणांमुळे बसेस उशिरा धावण्याचे प्रमाण यवतमाळ विभागात वाढले आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात सोडल्या जाणाºया फेऱ्यांविषयी दुर्लक्ष केले जाते. अमरावती, नागपूर मार्गावर शिवशाही बसची गर्दी आहे. या बसला प्रवासी मिळावे यासाठी केवळ बाहेरून येणाऱ्या साध्या बसेसच या मार्गावर धावतात. स्थानिक आगार पातळीवरून कितीही गर्दी असली तरी साध्या बसेस लावल्या जात नाही.नादुरुस्त असलेल्या बसेस आगारात निर्धारित कालावधीत दुरुस्त केल्या जात नाही. जिल्ह्यातील जवळपास आगारांमध्ये बसचा तुटवडा आहे. अशावेळी बस तत्काळ दुरुस्त करून उपयोगात आणली जाईल, अशी अपेक्षा असते. मात्र विविध कारणे सांगत दुरुस्तीला विलंब लावला जातो. अनेक चालक-वाहकांना अशावेळी कामगिरी मिळत नाही. तिकीट मशीनचे चार्जींग लवकरच उतरते. तिकीट ट्रे चालवायचे झाल्यास चालकांना किलोमीटरचा विसर पडला आहे. अशावेळी मशीनचा आग्रह धरला जातो. नादुरुस्त मशीनची गर्दी कमी होत नाही. नवीन मशीन उपलब्ध करून दिली जात नाही. अनेक बसेसच्या मागील टायरची हालत खस्ता झाली आहे. खिळखिळ्या झालेल्या बसमधून प्रवास करताना नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागत आहे. गळती लागत असलेल्या अनेक बसेस आजही मार्गावर धावत आहे. अशा बसेस मार्गावर धावल्यास कारवाई केली जाईल, असे परिपत्रक आहे. परंतु अपवादानेही कारवाई झालेली नाही. वरिष्ठ अधिकाºयांपुढे या सर्व बाबी नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आहे.प्रशिक्षणार्थ्यांकडून वसुलीप्रकरण थंडमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रतिमा मलीन होईल असा प्रकार दोन महिन्यांपूर्वी घडला. चालक प्रशिक्षण केंद्रातील शिकाऊ उमेदवारांकडून महामंडळाचा कर्मचारी पैसे घेत असल्याची चित्रफित सर्वदूर पसरली. प्राथमिक चौकशीत ही बाब स्पष्ट झाली. दरम्यान, पैसे घेणाऱ्या लिपिकाला निलंबित करण्यात आले. मात्र या प्रकारात गुंतलेल्या अनेक मंडळींवर कारवाई झाली नाही. सदर प्रकरणाची तक्रार पोलिसात द्या, असा स्पष्ट आदेश एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिला. पोलीस सहकार्य करत नाही, हे कारण सांगत अजूनतरी तक्रार झाली नाही. विभागातील वरिष्ठ अधिकाºयाचे नाव या प्रकरणात घेतले जाते. चौकशी अधिकाºयांवर दबाव तर नसावा, अशी साधार शंका व्यक्त केली जात आहे.