पाच दिवसात लाखभर अर्जाचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:15 IST2017-09-09T22:15:43+5:302017-09-09T22:15:59+5:30
जिल्ह्यातील तीन लाख १३ हजार ७६४ थकबाकीदारांना कर्जमाफीचा अर्ज भरायचा आहे. अद्याप एक लाख शेतकºयांना अर्ज दाखल करता आले नाही.

पाच दिवसात लाखभर अर्जाचे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील तीन लाख १३ हजार ७६४ थकबाकीदारांना कर्जमाफीचा अर्ज भरायचा आहे. अद्याप एक लाख शेतकºयांना अर्ज दाखल करता आले नाही. यामुळे पाच दिवसात हे अर्ज पोहोचतील कसे, असा प्रश्न शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे.
शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज आॅनलाईन भरण्याची सक्ती करण्यात आली. मात्र निर्धारित केंद्रावरून अर्जच भरले जात नाही. परिणामी शेतकºयांनी खासगी केंद्राकडे धाव घेतली. मात्र तेथे पैसे घेतले जाते. शासकीय केंद्रांना मोफत अर्ज स्वीकारण्याच्या सूचना होत्या. मात्र लिंक मिळत नसल्याने अर्धेअधिक शासकीय केंद्र ठप्प आहे.
जिल्ह्यात एक लाख ५५ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरल्याची नोंद झाली. नंतर किती अर्ज आले, याची नोंद खासगी केंद्रामुळे मिळत नाही. अद्याप एक लाख १३ हजार शेतकºयांना अर्ज भरता आले नाही. उर्वरित पाच दिवसात त्यांना हे अर्ज भरावे लागणार आहे.
मुदतवाढीचा प्रस्ताव रेंगाळला
सहकार विभागाने कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत वाढवावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर केला. मात्र, नवे जिल्हाधिकारी रुजू व्हायचे असल्याने हा प्रस्ताव रेंगाळला.