शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

रातचांदणात वादळाने सिमेंटचे घर कोसळले; अनेकांचा संसार आकाशाच्या छताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 15:03 IST

जनावरांच्या गोठ्यांनाही बसला तडाखा

यवतमाळ: वादळाच्या तडाख्याने रातचांदणा गावातील सिमेंटचे घरही कोसळले. छत उडाल्यामुळे अनेकांचा संसार आकाशाच्या छताखाली आला. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळवाºयामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लगतच्या धामणी गावालाही वादळाने झोडपून काढले. 

अवघ्या पाच मिनिटाच्या वादळाने या गावातील नागरिकांचा श्वास रोखला गेला होता. क्षणाक्षणाला घरावरील आणि जनावरांच्या गोठ्यावरील टीनपत्रे पत्त्याच्या पानाप्रमाणे उडत होती. घरात असलेल्या मंडळींचा जीवही धोक्यात आला होता. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. 

प्रल्हाद नामदेवराव चुटे यांचे सिमेंट काँक्रिटचे घर वादळामुळे पूर्ण जमिनदोस्त झाले. घराचा स्लॅब तुटून पडला. राजा भेंडारकर यांच्या घरावर असलेल्या सिमेंटच्या टीनपत्र्यांचा अक्षरश: चुराडा झाला. देवराव वाडेकर, चंपत मेश्राम यांच्या घरावरील छत उडाले. अरविंद बेंडे यांच्या शेतातील गोठा होत्याचा नव्हता झाला. त्यांच्या शेतात असलेले शेडनेटही फाटले. याशिवाय विनोद हेमने, तुळशीदास हेमने, गजानन मेंढे, गणेश हेमने, प्रमोद बेंडे यांच्यासह इतरही लोकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. सोमवारी सकाळी या गावातील मंडळी घर सावरण्याचा प्रयत्न करत होती. धामणी गावाला तडाखा

रविवारी झालेल्या वादळाचा धामणी गावालाही जोरदार तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. झोपडीवजा घरांचे नुकसान झाले. गोठ्यावरील छत उडाल्यामुळे उन्हाळ्यात जनावरांना बांधण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई मिळावी, अशी या नुकसानग्रस्तांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ