पिस्तुल रोखणारे सीसीटीव्हीत कैद
By Admin | Updated: October 16, 2016 00:57 IST2016-10-16T00:57:13+5:302016-10-16T00:57:13+5:30
येथील शासकीय रुगाणालय परिसरातील वाईन बारमध्ये दारूपित एका टोळक्याने वेटरवर चक्क पिस्तूल रोखले.

पिस्तुल रोखणारे सीसीटीव्हीत कैद
वाईनबारमधील प्रकरण : पोलीस करताहेत फुटेजवरून पाठलाग
यवतमाळ : येथील शासकीय रुगाणालय परिसरातील वाईन बारमध्ये दारूपित एका टोळक्याने वेटरवर चक्क पिस्तूल रोखले. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींचा शोध सुरू केला आहे.
शुक्रवारी रात्री चार जण या बारमध्ये मद्यपान करण्यासाठी आले. तिथे वेटर पंकज अशोक कहाळे रा. बांगरनगर हा काम करत होता. मद्यपान करणाऱ्या एकाने पिस्तूल काढून अशोकला तुला इथेच मारून टाकतो, असे म्हणत त्याच्या डोक्याला पिस्तूल लावले, तर दुसऱ्याने गाडीतून तलवार आण असे आपल्या सहकाऱ्याला सांगितले.
यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या चौघांपैकी एकाने समजूत काढून त्यांना बाहेर काढले. त्यानंतर ते मारोती झेन एमएच २९ - १८ या क्रमांकाच्या गाडीत बसून पसार झाले. या प्रकरणी अशोक कहाळे याच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी प्राणघात हल्ल्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरच आरोपींचा माग काढण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध चालविला असून अद्यापपर्यंत कुणीही पोलिसांच्या हाती लागले नव्हते. तपास उपनिरीक्षक भोई यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)