पांढरकवडात कर्जमुक्ती सुविधा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 23:06 IST2017-10-28T23:06:12+5:302017-10-28T23:06:24+5:30
राज्य शासनाने अजूनही शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे आता शिवसेनेने येथील जिल्हा बँकेसमोर गुरूवारपासून शेतकरी कर्जमुक्ती सुविधा केंद्र सुरू केले आहे.

पांढरकवडात कर्जमुक्ती सुविधा केंद्र
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : राज्य शासनाने अजूनही शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे आता शिवसेनेने येथील जिल्हा बँकेसमोर गुरूवारपासून शेतकरी कर्जमुक्ती सुविधा केंद्र सुरू केले आहे.
जिल्हा निबंधकांनी जिल्हा बँकेत एक लाख ६८ हजार ९०० खातेदारांचे अर्ज सादर केले आहे. यापैकी दीड लाख शेतकºयांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात पैसे जमा करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र अजुनपर्यंत एकही शेतकरी कर्जमुक्त झाला नाही. राष्ट्रीयकृत बँकांनी तर शासनाकडे लाभार्थ्यांच्या याद्याच सादर केल्या नसल्याचे बोलल्या जात आहे. शासनाने त्वरित शेतकºयांना कर्जमुक्त करावे, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करतील, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. या सुविधा केंद्रात माजी नगराध्यक्ष संतोष बोरेले, पंचायत समिती सदस्य पंकज तोडसाम, शहर प्रमुख किशोर कनाके, संजय झोटींग, किशोर पाटील, नटवर शर्मा, विलास गोडे, संतोष थोरात आदी मार्गदर्शन करीत आहे.