शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ भेटीच्या पार्श्वभूमीवर मनसे वाटणार गाजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 13:30 IST

येत्या १६ फेब्रुवारी नरेंद्र मोदी पांढरकवडा शहरात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाभर गाजर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत माहितीदरवर्षी साजरा करणार गाजर डे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निवडणुकीपूर्वी अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्री मोदींनी कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा सूर नेहमीच विरोधकांकडून ऐकायला मिळतो. येत्या १६ फेब्रुवारी नरेंद्र मोदी पांढरकवडा शहरात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाभर गाजर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.  असे असले तरी मनसेने मात्र गाजर वाटपाचा आणि मोदींच्या दौऱ्याचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरक

र यांनी वणी येथे पत्रकार परिषद घेऊन गाजर वाटप कार्यक्रमाची माहिती दिली. येत्या १६ फेबु्रवारीला यवतमाळ जिल्ह्यातील तालुकास्तरावर गाजर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मनसेचा हा अभिनव कार्यक्रम राजकीय वतुर्ळात चचेर्चा विषय ठरला आहे. गेल्या साडेचार वर्षात सर्वसामान्यांच्या कोणत्याही समस्या सुटल्या नाही. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या उत्थानाची अनेक स्वप्न दाखविली. परंतु त्या स्वप्नांची पूर्तता झाली नाही, असा आरोप विरोधकांचा आहे. अलिकडे मोदींची भाषणे व त्यांनी दिलेली आश्वासने विनोदी अंगाने घेतली जातात. नरेंद्र मोदी हे केवळ विकासाचे गाजर दाखवितात, असाही ठपका ठेवल्या जात आहे. त्यामुळे मनसेचा गाजर वाटपाचा कार्यक्रम हा भाजपाला डिवचण्यासाठी तर नाही ना, असा प्रश्न राजकीय वतुर्ळात विचारला जात आहे. मोदींच्या दौºयाची तारीख आणि मनसेच्या गाजर वाटप कार्यक्रमाचा मुहूर्त हा निव्वळ योगायोग नाही, असे मानले जात आहे. मोदींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या गाजर वाटपाचा कार्यक्रम घेण्यामागील उद्देश काय, असा प्रश्न विचारला असता, उंबरकर म्हणाले, गाजर हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आश्वासनाची गाजरे खाऊन नागरिकांची प्रकृती बिघडली आहे . त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे, यासाठीच आम्ही १६ फेब्रुवारीला जिल्हाभर गाजर वाटपाचा कार्यक्रम राबविणार आहोत, असे सांगून दरवर्षी आम्ही आता १६ फेब्रुवारीला गाजर डे साजरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

टॅग्स :Maharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाNarendra Modiनरेंद्र मोदी