येत्या १६ फेब्रुवारी नरेंद्र मोदी पांढरकवडा शहरात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाभर गाजर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ भेटीच्या पार्श्वभूमीवर मनसे वाटणार गाजरे
ठळक मुद्देपत्रपरिषदेत माहितीदरवर्षी साजरा करणार गाजर डे
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : निवडणुकीपूर्वी अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्री मोदींनी कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा सूर नेहमीच विरोधकांकडून ऐकायला मिळतो. येत्या १६ फेब्रुवारी नरेंद्र मोदी पांढरकवडा शहरात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाभर गाजर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. असे असले तरी मनसेने मात्र गाजर वाटपाचा आणि मोदींच्या दौऱ्याचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी वणी येथे पत्रकार परिषद घेऊन गाजर वाटप कार्यक्रमाची माहिती दिली. येत्या १६ फेबु्रवारीला यवतमाळ जिल्ह्यातील तालुकास्तरावर गाजर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मनसेचा हा अभिनव कार्यक्रम राजकीय वतुर्ळात चचेर्चा विषय ठरला आहे. गेल्या साडेचार वर्षात सर्वसामान्यांच्या कोणत्याही समस्या सुटल्या नाही. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या उत्थानाची अनेक स्वप्न दाखविली. परंतु त्या स्वप्नांची पूर्तता झाली नाही, असा आरोप विरोधकांचा आहे. अलिकडे मोदींची भाषणे व त्यांनी दिलेली आश्वासने विनोदी अंगाने घेतली जातात. नरेंद्र मोदी हे केवळ विकासाचे गाजर दाखवितात, असाही ठपका ठेवल्या जात आहे. त्यामुळे मनसेचा गाजर वाटपाचा कार्यक्रम हा भाजपाला डिवचण्यासाठी तर नाही ना, असा प्रश्न राजकीय वतुर्ळात विचारला जात आहे. मोदींच्या दौºयाची तारीख आणि मनसेच्या गाजर वाटप कार्यक्रमाचा मुहूर्त हा निव्वळ योगायोग नाही, असे मानले जात आहे. मोदींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या गाजर वाटपाचा कार्यक्रम घेण्यामागील उद्देश काय, असा प्रश्न विचारला असता, उंबरकर म्हणाले, गाजर हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आश्वासनाची गाजरे खाऊन नागरिकांची प्रकृती बिघडली आहे . त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे, यासाठीच आम्ही १६ फेब्रुवारीला जिल्हाभर गाजर वाटपाचा कार्यक्रम राबविणार आहोत, असे सांगून दरवर्षी आम्ही आता १६ फेब्रुवारीला गाजर डे साजरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
Web Title: Carrots will be distributed on backdrop of Narendra Modi's Yavatmal visit by MNS