डोळ्यांसाठी ग्लुकोमाची खबरदारी घ्या
By Admin | Updated: July 1, 2017 01:09 IST2017-07-01T01:09:22+5:302017-07-01T01:09:22+5:30
डोळ्यांच्या बाबतीत ग्लुकोमा या आजाराची लक्षणे सहसा जाणवत नाही, त्यामुळे रूग्ण काळजी घेत नाही.

डोळ्यांसाठी ग्लुकोमाची खबरदारी घ्या
पीयूष पाटील : नेत्ररोग तज्ज्ञांचे रूग्णांना आवाहन
वाणिज्य प्रतिनिधी
यवतमाळ : डोळ्यांच्या बाबतीत ग्लुकोमा या आजाराची लक्षणे सहसा जाणवत नाही, त्यामुळे रूग्ण काळजी घेत नाही. त्यातून आजार वाढून दृष्टीदोष निर्माण होतो. ग्लुकोमाची वेळीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. पीयूष पाटील यांनी केले.
‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. एम.बी.बी.एस., एम.एस. (गोल्ड मेडलिस्ट) असे उच्च शिक्षण घेतलेले डॉ. पीयूष पाटील म्हणाले, ग्लुकोमा हा डोळ्याच्या आॅप्टिक नर्व्हला हानी पोहोचवणारा विकार आहे. निरोगी डोळ्यात, एक्विसय ह्युमर डोळ्याच्या पुढील भागाच्या आत अभिसरित करतो.
अखंड निरोगी नेत्रदाब कायम ठेवण्यासाठी, जेव्हा डोळ्यातून कमी प्रमाणात हा द्रव वाहून जातो, तेव्हा डोळा सातत्याने त्याच प्रमाणात एक्वियस ह्युमर निर्माण करतो. एक्वियस ह्युमर मोठ्या प्रमाणात तयार झाल्यास किंवा योग्य पद्धतीने बाहेर न पडल्यास काळानुसार डोळ्यात द्रवदाब निर्माण होतो आणि आॅप्टिक नर्व्हला हानी पोहोचते.
ग्लुकोमाच्या उपचार पद्धतीबद्दल डॉ.पाटील यांनी माहिती दिली. टोनोमेट्रीथ, गोनियोस्कोपीथ, आॅप्थॅलमोस्कोपीथ, दृश्यात्मक क्षेत्र चाचणी बाजूच्या, पेरीमेट्र, पॅचीमेट्रीथ, आॅप्टीकल कोहेरन्स टोमोग्राफी द्वारा आरएनएफएल विश्लेषण आदी चाचण्या ग्लुकोमाच्या मूल्यमापनासाठी केल्या जातात. डोळ्यात टाकण्याची औषधे हा ग्लुकोमावरील उपचाराचा अतिशय सामान्य मार्ग आहे. काही रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया आवश्यक ठरत असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.