यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात धावती कार पेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 20:56 IST2020-09-19T20:55:47+5:302020-09-19T20:56:04+5:30
दारव्हा तालुक्याच्या बोरीअरब येथून चार किलोमीटर अंतरावरील लाडखेड फाटा ते पाथ्रड(देवी) मार्गावर शनिवारी दुपारी मारोती सुझुकी-८०० या धावत्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात धावती कार पेटली
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दारव्हा तालुक्याच्या बोरीअरब येथून चार किलोमीटर अंतरावरील लाडखेड फाटा ते पाथ्रड(देवी) मार्गावर शनिवारी दुपारी मारोती सुझुकी-८०० या धावत्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. मात्र वाहन संपूर्ण बेचिराख झाले. त्यामुळे या वाहनाचा नंबरही दिसेनासा झाला.
या वाहनातील प्रवासी हे अकोलाबाजार परिसरातील असल्याचे सांगितले जाते. परतीच्या प्रवासात गॅस किट असलेली ही गाडी अचानक पेटली व जळून खाक झाली. गॅस किट असताना ही गाडी पेट्रोलवर चालविल्याचेही सांगितले जाते. पेट्रोलमुळे भडका उडाला. गाडी पेटलेला हा टर्निंग पॉईंट जणू अपघात प्रवण स्थळ ठरला आहे. या पॉर्इंटवर अनेक अपघात झाले आहेत. त्यात कित्येकांना जीव गमवावा लागला, तर काहींना कायम अपंगत्व आले आहे.