नागपूरवरून हैदराबादकडे निघालेल्या कारचा भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 10:46 AM2019-11-21T10:46:18+5:302019-11-21T10:46:39+5:30

नागपूरवरून हैदराबादकडे निघालेल्या कारला पाटणबोरीलगत पिंपळखुटी रेल्वेपुलाजवळ भीषण अपघात झाला.

car accident Nagpur towards Hyderabad | नागपूरवरून हैदराबादकडे निघालेल्या कारचा भीषण अपघात

नागपूरवरून हैदराबादकडे निघालेल्या कारचा भीषण अपघात

Next

वणी (यवतमाळ) : नागपूरवरून हैदराबादकडे निघालेल्या कारला पाटणबोरीलगत पिंपळखुटी रेल्वेपुलाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात हैदराबाद येथील योगेश गुप्ता (३७) व पटाली किशोरकुमार क्रिष्णाचार्य (३६) हे दोघे जागीच ठार झाले. अन्य तीन जखमींना आदिलाबाद येथे उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले. गुरुवारी सकाळी ७ वाजता ही दुर्घटना घडली. दरम्यान, या अपघाताला रस्त्याची दुर्दशा कारणीभूत असल्याचा आरोप करत गावकर्‍यांनी घटनास्थळी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

Web Title: car accident Nagpur towards Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.