महिला उद्योजिका करतेय किशोरींना सक्षम

By Admin | Updated: November 20, 2014 23:00 IST2014-11-20T23:00:18+5:302014-11-20T23:00:18+5:30

कापडावर सुंदर व सुबक कशीदाकारी कलेच्या माध्यमातून उद्योग उभारणाऱ्या यवतमाळ येथील महिला उद्योजक रजनी शिर्के. विज्ञान शाखेच्या पदवीधर शिर्के यांनी स्वत: सक्षम होऊन किशोरी

Capable of teenager doing women entrepreneurship | महिला उद्योजिका करतेय किशोरींना सक्षम

महिला उद्योजिका करतेय किशोरींना सक्षम

अनोखा उपक्रम : दिल्लीच्या महाराष्ट्र दालनात कशीदाकारी ठरतेय आकर्षण
यवतमाळ : कापडावर सुंदर व सुबक कशीदाकारी कलेच्या माध्यमातून उद्योग उभारणाऱ्या यवतमाळ येथील महिला उद्योजक रजनी शिर्के. विज्ञान शाखेच्या पदवीधर शिर्के यांनी स्वत: सक्षम होऊन किशोरी बचत गट आणि महाविद्यालयीन मुलींना कशीदाकारी शिकवून स्वावलंबी बनवल. या महिन्याअखेर इटली येथे आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात त्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
 प्रगती मैदानावर सुरु असलेल्या ३४ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र दालनात आपल्या कलाविष्काराचे प्रदर्शन आणि विक्री करण्याची संधी राज्यातील विविध भागातून आलेल्या महिलांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या महिला उद्योजक यावर्षीच्या व्यापार मेळाव्याची संकल्पना आहे. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाने येथे ७५ स्टॉल उभारून दिले असून ९७ महिला उद्योजकांनी येथे सहभाग नोंदवला आहे.
दालनाच्या तळ मजल्यात विविध वस्तूंचे स्टॉल्स आहेत. यात गाळा क्रमांक ५ आपलं लक्ष वेधून घेतो तो २ महिला उद्योजिकांच्या विशेष कलेनं. त्यातील एक आहेत वैशाली अविनाश रिंगणे ज्यांनी इंटेरियर डिझाइनसाठी लागणाऱ्यावस्तू बनवून स्वतंत्र उद्योग थाटला. रजनी शिर्के ज्यांनी अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या कशीदाकारीला आपला छंद व नंतर जीवनचरितार्थाचे व समाजकार्याचे माध्यम बनवले. यजमान व कुटुंबियांनी दिलेल्या प्रोत्साहन व मदतीमुळे आज त्यांचा उद्योग नावारूपाला आला. कशीदाकारी जीवंत रहावी व या कलेच्या माध्यमातून आपल्याप्रमाणे इतरही महिला सक्षम करण्याचे कार्य त्या करताहेत.
विविध प्रकारच्या अनकुचीतदार सुई, साजेशे रंगीत धागे आणि विणकामासाठी  उपयोगी येणारी रिंग एवढी स्वस्त साधन या कामी लागतात असे शिर्के सांगतात. पण एक पेंटीग तयार करण्यासाठी लागणारा कालावधी हा ४ महिने आहे. मग घरातील सर्व काम आवरून दररोज ५ तास या कामासाठी देऊन त्यांनी कापडावर धाग्यांच्या माध्यमातून चित्र आकाराला आणले. स्वत:च्या कामाचा त्यांना योग्य मोबदला मिळू लागला. ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी व या कलेच्या माध्यामातून आपल्यासारख्या अन्य महिला ही स्वावलंबी व्हाव्यात या संकल्पनेन त्यांच्या मनात घर केल. मग त्यांनी त्यास प्रत्यक्षात आणण्यासाठी महिला बचत गटा प्रमाणेच मुलींचा बचतगट अर्थात किशोरी बचत गटाच्या मुलींना कशीदाकारीचे प्रशिक्षण दयायला सुरुवात केली. कामाच्या मोबदल्यात या मुलींना पैसेही मिळू लागले. त्यांनी यवतमाळ येथील सावत्री-ज्योती समाजकार्य महाविद्यालयातील मुलींनाही ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत कशीदाकारीचे प्रशिक्षण दयायला सुरुवात केली. 
म्हणजे स्वत: सक्षम झालेल्या रजनी शिर्के यांनी इतर महिलांना स्वावलंबी बनवण्यात पुढाकार घेवून महिलांमध्ये उद्योगप्रियता रूजवण्याचे मोलाचे काम केले आहे. येत्या २९ नोव्हेंबर पासून इटलीतील मिलान येथे सुरु होत असलेल्या १९ व्या आंतरराष्ट्रीय हस्तकला विक्री प्रदर्शनात रजनी शिर्के यांची निवड झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Capable of teenager doing women entrepreneurship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.