शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

राळेगावला सत्तांतरातही कॅबिनेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 9:49 PM

महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतरही राळेगाव मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. काँग्रेसच्या काळात प्रा.वसंत पुरके तर, आता प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या रूपाने मतदारसंघाला हा मान मिळाला आहे. डॉ.उईके यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याची वार्ता पोहोचताच समर्थकांनी फटाके फोडून, ढोल-ताशाच्या गजरात आनंद साजरा केला.

ठळक मुद्देसमर्थकांमध्ये जल्लोष : अशोक उईके यांचा प्रवास नगर परिषद उपाध्यक्ष ते राज्याचे मंत्री

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतरही राळेगाव मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. काँग्रेसच्या काळात प्रा.वसंत पुरके तर, आता प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या रूपाने मतदारसंघाला हा मान मिळाला आहे. डॉ.उईके यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याची वार्ता पोहोचताच समर्थकांनी फटाके फोडून, ढोल-ताशाच्या गजरात आनंद साजरा केला.राळेगाव मतदारसंघातून प्रा.डॉ. अशोक उईके यांनी पहिल्यांदा २००४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना ५३ हजार ४६८ मते मिळाली. प्रा.पुरके यांच्याकडून त्यांचा १० हजार ८५९ मतांनी पराभव झाला होता. २००९ मध्ये ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यावेळी त्यांच्या मतांचा टक्का घसरला. अशाही परिस्थितीत त्यांनी हार न मानता लोकांशी सतत संपर्क ठेवला. यानंतर २०१४ ची निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढली. यात त्यांनी ४० हजारांच्यावर मताधिक्य घेऊन १५ वर्षांपासून मंत्रीपद भूषविलेल्या प्रा.पुरके यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवार भावना गवळी यांना राळेगाव मतदारसंघात ३० हजारांच्या आसपास आघाडी मिळाली, हे विशेष.डॉ.अशोक उईके हे १९९७ ते २००१ पर्यंत बुलडाणा नगरपरिषदेचे सदस्य होते. या नगरपरिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ते वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आहे. अनूसूचित जाती-जमाती समितीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. मतदार संघातील देवधरी येथे बिरसा मुंडा सहकारी सूतगिरणीची स्थापना त्यांनी केली. यामाध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राळेगाव, कळंब, बाभूळगाव येथे त्यांनी सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत आपल्या कार्याची छाप सोडली.लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार डॉ.अशोक उईके यांचे प्रामाणिक प्रयत्न राहिले. त्यांना मिळालेल्या मंत्रीपदामुळे मतदार संघातील विविध प्रश्न तातडीने मार्गी लागतील, अशी अपेक्षा जनतेला आहे. डॉ.अशोक उईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच कळंब, राळेगाव व बाभूळगाव तालुक्यातील अनेक गावात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. पेढे वाढून आनंद व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :Ashok Uikeअशोक उइके