शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

परवडत नाही म्हणून काय पण; चहा टपऱ्यांवर घरगुती सिलिंडर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 05:00 IST

शहरासह तालुक्यात अनेक बेरोजगारांसह काहींनी चहा टपरीची दुकाने थाटली आहे. यातून त्यांनी स्वयंरोजगार सुरू केला. मात्र वाढत्या महागाईमुळे चहा टपरी आणि हाॅटेलमध्ये व्यावसायिक सिलिंडरचा वापर करणे कठीण झाले आहे. त्यावर मात म्हणून बहुतांश व्यावसायिकांनी घरातील सिलिंडर काढून चहा टपरीत लावले आहे. घरगुती सिलिंडर व्यावसायिक कारणासाठी वापरणे गुन्हा आहे. मात्र पुरवठा विभाग उदासीन असल्याने कोणतीही कारवाई होत नाही.

ज्ञानेश्वर ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : व्यावसायिक सिलिंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक चहा टपरीधारकांनी घरगुती सिलिंडरचा वापर सुरू केला आहे. या प्रकाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. शहरासह तालुक्यात अनेक बेरोजगारांसह काहींनी चहा टपरीची दुकाने थाटली आहे. यातून त्यांनी स्वयंरोजगार सुरू केला. मात्र वाढत्या महागाईमुळे चहा टपरी आणि हाॅटेलमध्ये व्यावसायिक सिलिंडरचा वापर करणे कठीण झाले आहे. त्यावर मात म्हणून बहुतांश व्यावसायिकांनी घरातील सिलिंडर काढून चहा टपरीत लावले आहे. घरगुती सिलिंडर व्यावसायिक कारणासाठी वापरणे गुन्हा आहे. मात्र पुरवठा विभाग उदासीन असल्याने कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे बहुतांश व्यावसायिकांनी सर्रास घरगुती सिलिंडरचा वापर सुरू ठेवला आहे. आता त्याचेही दर वाढले आहे. मात्र काही प्रमाणात यात पैशांची बचत होत आहे. 

व्यावसायिक २४७९ ला, घरगुती १०४८ ला- व्यावसायिक सिलिंडरचे दर दोन हजार ४७९ तर घरगुती सिलिंडरचे दर एक हजार ४८ रुपयांवर पोहोचले आहे.- तालुक्यातील व्यावसायिकांकडे ११८ सिलिंडर आहे. त्यापैकी ३७ महागाव शहरात आहे.

व्यावसायिक सिलिंडरचा वापर २० टक्क्यांनी घटलाव्यावसायिक सिलिंडरचे दर वाढल्याने जवळपास २० टक्क्यांनी त्यांचा वापर घटला आहे. त्याऐवजी व्यावसायिक घरगुती सिलिंडर वापरताना दिसत आहे. यामुळे त्यांना काही प्रमाणात लाभ होत आहे.  

कारवाई कोण करणार?

घरगुती सिलिंडरचा सर्रास व्यावसायिक कारणासाठी वापर होत असताना पुरवठा विभाग उदासीन आहे. हा विभाग कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे व्यावसायिक बिनदिक्कत घरगुती सिलिंडरचा वापर करतात.

‘लोकमत’ने काय पाहिले?

 बसस्थानक परिसर बसस्थानक परिसरात अनेक चहा टपऱ्या आहेत. त्यापैकी काहींमध्ये घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर केला जात होता. व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढल्याने अनेकांनी घरगुती सिलिंडर टपरीवर लावले आहे. 

 तहसील परिसर  तहसील परिसरातीलही बहुतांश चहा टपऱ्यांमध्ये घरगुती सिलिंडर लावल्याचे दिसून आले. व्यावसायिक लपून-छपून या सिलिंडरचा वापर करतात. छोटे हाॅटेल व्यावसायिकही घरगुती सिलिंडरच वापरतात. 

...तर होऊ शकतो गुन्हा दाखलघरगुती सिलिंडर व्यावसायिक वापरासाठी उपयाेगात आणता येत नाही. या प्रकरणी तक्रार झाल्यास किंवा पुरवठा विभागाला माहिती पडल्यास संबंधित व्यावसायिकावर गुन्हा दाखल होऊ शकतो. 

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर