ट्रॅक्टरवर धडकून बसचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:26 PM2019-06-21T22:26:27+5:302019-06-21T22:26:50+5:30

पांढरकवडा मार्गावर वटबोरीजवळ एसटी बस शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली. यात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर २१ प्रवासी जखमी झाले. जखमींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले.

The bus driver killed in the tractor | ट्रॅक्टरवर धडकून बसचालक ठार

ट्रॅक्टरवर धडकून बसचालक ठार

googlenewsNext
ठळक मुद्दे२१ जखमी : यवतमाळ-पांढरकवडा मार्गावर वटबोरीजवळ अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पांढरकवडा मार्गावर वटबोरीजवळ एसटी बस शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली. यात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर २१ प्रवासी जखमी झाले. जखमींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले.
अजय रामदुलारे श्रीवास (५९) रा. शिंदेनगर यवतमाळ मृताचे नाव आहे. पांढरकवडा आगाराची बस (एम.एच.०६ एस ८८२४) यवतमाळवरून प्रवासी घेऊन पांढरकवडाकडे निघाली. वटबोरी गावासमोरच्या वळणावर बसची ट्रॅक्टरला धडक बसली. यात विटा भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली थेट एसटी चालकाच्या बाजूने आदळली. यात अजय श्रीवास यांचा जागीच मृत्यू झाला. तर २१ प्रवासी जखमी झाले. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.
निवृत्तीच्या तोंडावर मृत्यू
एसटीमध्ये बसचालक म्हणून अजय श्रीवास यांनी दीर्घ सेवा दिली होती. या काळात कुठलाही अपघात त्यांच्या हातून घडला नाही. निवृत्तीला जेमतेम महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना त्यांच्या बसला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: The bus driver killed in the tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात