मोक्षधामातील जलतनही आता संपण्याच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 05:00 IST2021-04-17T05:00:00+5:302021-04-17T05:00:02+5:30
कोरोनामुळे आतापर्यंत ८४३ जनांचा मृत्यू झाला. यातील बहूतांश कोरोना बाधित मृतदेहावर यवतमाळच्याच मोक्षधामात अंत्यसंस्कार पार पडले. मोक्षधामातील ओटेही कमी पडत आहे. दररोज मोठया प्रमाणात जलतन लागत असल्याने अनेक संघटना पुढे आल्या आहेत. काही नागरिकांनी जलतन दान केले होते. दात्यांचा हा ओघ कमी पडत आहे. मोक्षधामात आणखी जलतनाची गरज निर्माण झाली आहे.

मोक्षधामातील जलतनही आता संपण्याच्या वाटेवर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना मृत्यूचे आकडे डोळे विस्फारणारे आहे. यासोबतच अंत्यविधीला लागणाऱ्या जलतनाचीही चिंता वाढली आहे.
दररोज यवतमाळच्या मोक्षधामात १२ ते १५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत आहे. शुक्रवारी तर २५ कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. याशिवाय सर्वसामान्य मृतदेहांचाही समावेश आहे. यातून मोक्षधामात लोकवर्गणीतून जमा झालेले जलतन संपत आले आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत ८४३ जनांचा मृत्यू झाला. यातील बहूतांश कोरोना बाधित मृतदेहावर यवतमाळच्याच मोक्षधामात अंत्यसंस्कार पार पडले. मोक्षधामातील ओटेही कमी पडत आहे. दररोज मोठया प्रमाणात जलतन लागत असल्याने अनेक संघटना पुढे आल्या आहेत. काही नागरिकांनी जलतन दान केले होते. दात्यांचा हा ओघ कमी पडत आहे. मोक्षधामात आणखी जलतनाची गरज निर्माण झाली आहे.
आधी जलतन नंतर बॉडी
मोक्षधामात मृतदेह आणताना आधी जलतनाचे नियोजन केले जाते. यानंतरच मृतदेह दाखल होतात. एका मृतदेहाला अडीच क्विंटल जलतन लागत आहे.
मोक्षधामात जलतानाची नितांत आवश्यकता आहे. यवतमाळकरांनी त्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. दररोज मोठ्या प्रमाणत लोकसहभाग मिळत आहे. आणखी लोकसहभागाची आवश्यकता आहे.
- डाॅ. विजय अग्रवाल,
वैद्यकीय अधिकारी, नगरपालिका यवतमाळ