बजेटची १६ कोटींची कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: December 16, 2015 02:44 IST2015-12-16T02:44:53+5:302015-12-16T02:44:53+5:30

आर्थिक वर्ष संपत आले असतानाही जिल्हा परिषद बांधकाम विभागाला अद्यापही बजेटमधील १६ कोटींच्या कामाची मंजुरी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही.

Budget worth 16 crores is waiting for approval | बजेटची १६ कोटींची कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत

बजेटची १६ कोटींची कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत

यवतमाळ : आर्थिक वर्ष संपत आले असतानाही जिल्हा परिषद बांधकाम विभागाला अद्यापही बजेटमधील १६ कोटींच्या कामाची मंजुरी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही.
२०१५-१६ या आर्थिक वर्षातील तीनच महिने शिल्लक राहिले आहेत. आता बांधकाम विभागाकडून बजेटच्या कामाचे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविण्याची धडपड केली जात आहे. बांधकाम विभाग एक व बांधकाम विभाग दोन कडून १६ कोटींचे काम आहे. यात बहुतांश ३०-५४ म्हणजेच रस्ते विकासाची कामे प्रस्तावित आहेत. २० लाखांच्या आतील कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचा अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे. तर २३ ते ५० लाखांपर्यंतच्या कामांना बांधकाम समितीत मंजुरी दिली जाते. ५० लाखांवरील कामांसाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागते. १५ लाखांच्या आतील कामांचे बेजरोजगार अभियंता आणि मजूर कामगार सहकारी सोसायटी यांच्यात ३०-३३ प्रमाणे विभागणी केली जाते. जुन्या कामगार सोसायट्या रद्द केल्या असून नव्याने नोंदणी केलेल्या सोसायटीलाच काम दिले जाणार आहे. एकंदरच ही प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याने गुंतागुंतीची झाली असून जानेवारी अखेरपर्यंत कार्यादेश काढण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Budget worth 16 crores is waiting for approval