भावाच्या मारेकऱ्याला अखेर चिल्लीच्या नागरिकांनीच शोधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST2019-09-09T06:00:00+5:302019-09-09T06:00:11+5:30

अर्जून पांडुरंग राठोड (१८) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना बुधवारी ५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील चिल्ली (इजारा) गावात घडली होती. अर्जूनने आपला मोठा भाऊ गोपाल पांडुरंग राठोड (२२) याच्या डोक्यावर लोखंडी पाइपने वार करून त्याचा खून केला. या घटनेत या दोन भावांची आई देखील जखमी झाली होती. घटनेनंतर अर्जून राठोड पसार झाला होता.

The brother of the killer was eventually discovered by the Chilean citizens | भावाच्या मारेकऱ्याला अखेर चिल्लीच्या नागरिकांनीच शोधले

भावाच्या मारेकऱ्याला अखेर चिल्लीच्या नागरिकांनीच शोधले

ठळक मुद्देतीन दिवस घेतला शोध : आरोपीने झाडावर ठोकला होता मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : गंभीर मारहाण करून लहान भावाने मोठ्या भावाचा निर्घृण खून केल्याची घटना चिल्ली इजारा गावात ५ सप्टेंबर रोजी घडली होती. तीन दिवस उलटूनही या आरोपीला पकडण्यात महागाव पोलिसांना अपयश आले. मात्र स्वत: गावकऱ्यांनी सतत शोध मोहीम राबवून अखेर आरोपी भावाला पकडून रविवारी सकाळी पोलिसांच्या ताब्यात दिले.
अर्जून पांडुरंग राठोड (१८) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना बुधवारी ५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील चिल्ली (इजारा) गावात घडली होती. अर्जूनने आपला मोठा भाऊ गोपाल पांडुरंग राठोड (२२) याच्या डोक्यावर लोखंडी पाइपने वार करून त्याचा खून केला. या घटनेत या दोन भावांची आई देखील जखमी झाली होती. घटनेनंतर अर्जून राठोड पसार झाला होता. तीन दिवस उलटून गेल्यावरही खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात महागाव पोलिसांना यश आले नाही.
दरम्यान चिल्ली इजारा गावकऱ्यांनी स्वत:च परिसरातील शेतशिवारात अर्जूनची शोध मोहीम सुरू केली होती. अखेर रविवारी सकाळी १० वाजता गावकऱ्यांना चिल्ली शिवारात कुंभीच्या झाडावर दडून बसलेला आरोपी अर्जून सापडला. गावकऱ्यांची ही शोध मोहीम तब्बल ८४ तास चालली, असे पोलिस पाटील राजू राठोड यांनी माहिती दिली. गावातील तरूणांनी, यात महत्वाची भूमिका बजावली.

Web Title: The brother of the killer was eventually discovered by the Chilean citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.