शेतकऱ्यांवर दलालीचा बोझा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:23 IST2017-12-10T01:23:11+5:302017-12-10T01:23:32+5:30

निसर्गाच्या फटक्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता दलालांच्या लुटीचा सामना करावा लागत आहे. नियमानुसार कापूस खरेदी विक्रीच्या व्यवहारात दलाली घेता येत नसताना वणी शहरासह उपविभागातील कापूस खरेदीदार....

Brokerage on Farmers | शेतकऱ्यांवर दलालीचा बोझा

शेतकऱ्यांवर दलालीचा बोझा

ठळक मुद्देनियमांची पायमल्ली : वणी उपविभागात कापूस उत्पादकांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : निसर्गाच्या फटक्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता दलालांच्या लुटीचा सामना करावा लागत आहे. नियमानुसार कापूस खरेदी विक्रीच्या व्यवहारात दलाली घेता येत नसताना वणी शहरासह उपविभागातील कापूस खरेदीदार संस्थांमधील दलाल शेतकऱ्यांकडून एक ते दीड टक्के दलाली वसूल करीत आहेत. त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
अगोदरच कपाशीचे उत्पन्न निम्म्यापेक्षा कमी झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. त्यात आता दलालीचा बोझा सहन करावा लागत असल्याने शेतकºयांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. १०० रुपयांमागे एक ते दीड टक्के दलाली घेतली जात आहे. रोखीच्या व्यवहारात तर दोन टक्के दलाली शेतकऱ्यांवर लादली जात आहे. केवळ गरजेपोटी शेतकरी हा फटका सहन करीत आहेत. गंभीर बाब ही की, या दलालांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने दलालांचा कारभार ‘सैैराट’ झाला आहे. नियमानुसार दलालांनी त्यांची दलाली कापूस खरेदीदार व्यापाºयाकडून घेणे अपेक्षित आहे. मात्र काही दलाल व्यापाऱ्यांकडूनही दलाली घेत आहेत, आणि शेतकºयांनाही दलालीच्या नावाखाली लुटत आहेत.
यंदा कापसावर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाल्याने कपाशीचे ६० टक्के नुकसान झाले. जेथे एका हंगामात १० ते ११ वेळा कापूस वेचणी व्हायची, तेथे केवळ एका वेचणीने शेत रिकामे झाले. त्यामुळे शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागले. कर्ज काढून कापसाचे उत्पादन घेणारे शेतकरी या संकटाने पार कोलमडून गेलेत. हाती आलेला कापूस विकून येईल त्या रकमेत पुढील गरजा भागविण्याच्या मानसिकतेत शेतकरी असताना व्यवस्थेकडून त्यांना नागवले जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवली असताना, शेतकरी नेते गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सीसीआयच्या पारड्यात १०० क्विंटल
यंदा शासनाची अधिकृत कापूस खरेदीदार एजन्सी असलेल्या सीसीआयला कापूस विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला नाही. परिणामी या हंगामात ९ डिसेंबरपर्यंत सीसीआयला केवळ १०० क्विंटल कापूस खरेदी करता आला. खासगीत शेतकºयांना चांगला भाव मिळत आहे.

Web Title: Brokerage on Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.