प्रेयसीला गर्भवती करून प्रियकर फरार; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 19:37 IST2021-05-13T19:36:46+5:302021-05-13T19:37:07+5:30

Yawatmal news कॉलेजला सुट्या लागल्याने गावाकडे परत येताना, खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकाशी सूत जुळले. गाठीभेटी वाढल्या यातून ती गर्भवती राहिली. ही बाब प्रियकराला कळताच, त्याने पोबारा केला. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Boyfriend escapes by making girlfriend pregnant; Filed a crime | प्रेयसीला गर्भवती करून प्रियकर फरार; गुन्हा दाखल

प्रेयसीला गर्भवती करून प्रियकर फरार; गुन्हा दाखल

ठळक मुद्दे प्रवासातील ओळखीतून जुळले होते सूत

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ: कॉलेजला सुट्या लागल्याने गावाकडे परत येताना, खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकाशी सूत जुळले. गाठीभेटी वाढल्या यातून ती गर्भवती राहिली. ही बाब प्रियकराला कळताच, त्याने पोबारा केला. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारेगाव तालुक्यातील एका पोडावरील तरुणी एका आश्रमशाळेत कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती. मात्र, महाविद्यालयाला सुटी लागल्याने पीडित तरूणी पांढरकवडा तालुक्यातील मोहदा येथून पुणे-चंद्रपूर या मार्गाने धावणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्समध्ये बसली. प्रवासादरम्यान त्या ट्रॅव्हल्सचा वाहक अनिकेत सदाशिव टेकाम (२५) याच्याशी तिची ओळख झाली. तो वरोरा (चंद्रपूर) तालुक्यातील मांगली येथील रहिवासी आहे. ओळखीनंतर मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. यातून दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. लग्नाच्या आणाभाका घेतल्या. एकमेकांच्या घरी येणे जाणे सुरू झाले. लग्न करणारच असल्याने घरच्यांनी ही त्या दोघांच्या भेटीगाठीला विरोध केला नाही.

विशेष म्हणजे ८ जानेवारी २०१२ पासून पीडित युवती अडीच महिने अनिकेत टेकामच्या घरी वास्तव्याला होती. याचदरम्यान, ती गर्भवती राहिली. याची कुणकुण लागताच, मी ट्रॅव्हल्सवर कामासाठी जात आहे, असे सांगून अनिकेतने पीडित युवतीला तिच्या आई-वडिलांच्या घरी आणून सोडले. तेव्हापासून अनिकेत फरार झाला असून त्याचा मोबाईल देखील बंद आहे. प्रियकराची वाट पाहून थकलेल्या पीडितेला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच, तिने मारेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांपुढे आपबिती सांगितली. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेऊन आरोपी अनिकेत टेकाम विरूद्ध भादंवी ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Boyfriend escapes by making girlfriend pregnant; Filed a crime