भोन तलावातून चेंडू काढायला गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

By दत्ता यादव | Updated: May 17, 2025 22:24 IST2025-05-17T22:22:00+5:302025-05-17T22:24:53+5:30

क्रिकेट खेळताना तलावातून चेंडू काढताना एका ९ वर्षाच्या मुलाचा पाण्यात पडून मृत्यू झाला.

Boy drowns while trying to retrieve ball from pond | भोन तलावातून चेंडू काढायला गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

भोन तलावातून चेंडू काढायला गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

दत्ता यादव, सातारा: क्रिकेट खेळत असताना कास तलावात गेलेला चेंडू काढताना पाय घसरून पाण्यात पडल्याने एका ९ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या जवानांनी रात्री उशिरा तलावातून मुलाचा मृतदेह बाहेर काढला.

राकेश कमल विश्वकर्मा (वय ९, रा. मोरे कॉलनी, मंगळवार तळे परिसर, सातारा, मूळ रा. नेपाळ), असे कास तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वकर्मा कुटुंबीय शनिवारी सायंकाळी कास तलावाजवळ फिरण्यासाठी गेले होते. तलावाशेजारी असलेल्या ब्रिटिशकालीन बंद बंगल्याशेजारी राकेश व अन्य मुले क्रिकेट खेळत होती. खेळता-खेळता चेंडू कास तलावात गेला. हा चेंडू आणण्यासाठी राकेश गेला असता तो पाय घसरून तलावात पडला.

हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येण्यापूर्वीच तो तलावात दिसेनासा झाला. काही वेळानंतर या घटनेची माहिती मेढा पोलिस व शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला देण्यात आली. सायंकाळी पाचच्या सुमारास रेस्क्यू टीमचे पथक तेथे पोहोचले. तलावात उतरून त्यांनी शोधमोहीम राबविली. बराचवेळ तलावात शोध घेतल्यानंतर रात्री आठच्या सुमारास राकेश याचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले. त्याचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी आक्रोश केला. मेढा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.

Web Title: Boy drowns while trying to retrieve ball from pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.