शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दोघांचा मृत्यू, ५६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

जिल्ह्यात मंगळवारी कोरोनावर मात केल्याने ८० रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यामुळे सध्या अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४४० झाली आहे. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या एक हजार २८४ झाली असून त्यातील ८१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत आयसालेशन वार्डात १३० जण दाखल असून उपचार घेत आहे. आतापर्यंत २० हजार ७८१ नमुने तपासणीसाठी पाठविले गेले.

ठळक मुद्देकोरोना उद्रेक : ८० जणांची कोरोनावर मात, रुग्णालयातून सुटी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायमच असून मंगळवारी आणखी दोघांचा या आजाराने मृत्यू झाला. शिवाय ५६ नव्या रुग्णांचीही भर पडली.पाटीपुरा येथील ६५ वर्षीय महिला आणि दिग्रस तालुक्याच्या फुलवाडी येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. या दोघांच्या मृत्यूने जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोना बळींचा आकडा ३७ वर पोहोचला आहे. मंगळवारी ५६ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामध्ये पुसद तालुक्यातील पाच, दिग्रस १९, पांढरकवडा २, यवतमाळ ६, उमरखेड शहरातील १७, आर्णी ५ तर नेर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.जिल्ह्यात मंगळवारी कोरोनावर मात केल्याने ८० रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यामुळे सध्या अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४४० झाली आहे. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या एक हजार २८४ झाली असून त्यातील ८१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत आयसालेशन वार्डात १३० जण दाखल असून उपचार घेत आहे. आतापर्यंत २० हजार ७८१ नमुने तपासणीसाठी पाठविले गेले. त्यापैकी चार हजार २३९ नमुन्यांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. अ‍ॅन्टीजन किटच्या माध्यमातून आणखी तत्काळ अहवाल मिळणार आहे.दर्डानगर, संभाजीनगरात कोरोना रुग्णमंगळवारी यवतमाळ शहरातील सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आरोग्य प्रशासनाच्या दप्तरी घेण्यात आली आहे. त्यामध्ये दर्डानगर, संभाजीनगर, आंबेडकर चौक, काळे ले-आऊट, कमला पार्क येथील महिला व पुरुष रुग्णांचा समावेश आहे.यवतमाळ तालुक्यात सर्वाधिक २२६ रुग्णजिल्ह्यात सर्वाधिक २२६ रुग्णांची नोंद एकट्या यवतमाळ तालुक्यात झाली आहे. त्यात सात मृत्यू व ३१ पॉझिटिव्ह आहेत. त्या खालोखाल केळापूर १९५, पुसद १९९, दिग्रस १६६ तर दारव्हा तालुक्यातील ७३ रुग्णांची नोंद झाली. तेथे अनुक्रमे दोन, पाच, दोन, सहा एवढे मृत्यू नोंदविले गेले आहे. बाभूळगाव तालुक्यात मात्र अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद शासन दप्तरी नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या