कोरोना वॉर्डमधून बेपत्ता इसमाचा मृतदेह सापडला; यवतमाळमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 18:13 IST2021-04-03T18:13:43+5:302021-04-03T18:13:52+5:30
घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचविणारा शंकर कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने त्याला यवतमाळच्या शासकीय कोविड वॉर्डमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.

कोरोना वॉर्डमधून बेपत्ता इसमाचा मृतदेह सापडला; यवतमाळमधील घटना
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड वार्डातून २७ मार्च रोजी बेपत्ता झालेल्या ५५ वर्षीय इसमाचा शुक्रवारी सायंकाळी येथील लोहारा परिसरात मृतदेहच आढळून आला. शंकर तुकाराम देशमुख (रा.शिवाजीनगर, नेर, जि.यवतमाळ) असे मृताचे नाव आहे.
घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचविणारा शंकर कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने त्याला यवतमाळच्या शासकीय कोविड वॉर्डमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. २७ मार्चला सिटी स्कॅन करण्यासाठी त्याला वार्डाबाहेर आणले असता तो तेथून अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांना याची माहिती दिल्यानंतर त्याची शोधाशोध केली. मात्र, थांगपत्ता लागला नाही. यवतमाळ शहर पाेलिसांनी शंकरच्या बेपत्ता होण्याची नोंद घेतली. त्याचा शोध सुरू असतानाच यवतमाळातील लोहारा परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.