स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
By Admin | Updated: July 1, 2014 01:43 IST2014-07-01T01:43:25+5:302014-07-01T01:43:25+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रेरणास्थळ आयोजन समिती आणि गांधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराचे उद्घाटन बाबूजींचे स्वातंत्र्य लढ्यातील सहकारी ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्राणजीवन जानी आणि बाबाराव राऊत यांच्या उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता करण्यात येणार आहे. दरवर्षी जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. गोरगरीब गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे यासाठी शिबिर आयोजित आहे. रक्तदान शिबिरात रक्त संकलनासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी सहकार्य करणार आहे. या शिबिरात यवतमाळ शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन प्रेरणा स्थळ आयोजन समिती, गांधी सेवा समिती आणि जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. प्रगती पवार (७७०९९९४२७६), प्रा.पद्ममिनी कौशीक (९८२३२८२३७२) यांच्याशी संपर्क साधावा. (नगर प्रतिनिधी)