Blanket from the Market Committee for Local Farmers | मुक्कामी शेतकऱ्यांंना बाजार समितीकडून ब्लँकेट
मुक्कामी शेतकऱ्यांंना बाजार समितीकडून ब्लँकेट

ठळक मुद्देअतिरिक्त हमाल बोलावले : आता सुटीच्या दिवशीही शेतमालाचा लिलाव, शेतमालावर नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सोयाबीन विक्रीसाठी बाजार समितीत दरदिवशी शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. काटा होण्यासाठी दोन-दोन दिवस शेतकºयांना मुक्कामी रहावे लागत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच बाजार समिती व्यवस्थापनाने मुक्कामी शेतकऱ्यांसाठी ब्लँकेटची व्यवस्था केली आहे. शिवाय सोयाबीनचे मोजमाप लवकर करता यावे याकरिता अतिरिक्त हमालही बोलाविण्यात आले आहे. सुटीच्या दिवशीही लिलाव केला जात आहे.
परतीच्या पावसाने लांबलेला सोयाबीनचा हंगाम संपताच शेतमाल विक्रीकरिता बाजारात आला आहे. सर्वच शेतकºयांनी मोठ्याप्रमाणात सोयाबीन विक्रीकरिता आणले आहे. यातून बाजारपेठेत एकच तारांबळ उडाली आहे. दर दिवसाला क्षमतेपेक्षा अधिक सोयाबीन बाजारात येत आहे. यामुळे सोयाबीन विक्रीकरिता आणणाऱ्या शेतकऱ्यांना मुक्काम करावा लागत आहे.
हा गुंता सोडविण्यासाठी बाजार समितीने ठोस पावले उचलली आहे. सोयाबीनची आवक नियंत्रित करण्यासाठी लागणारे अतिरिक्त हमाल आणण्यात आले आहे. यामुळे शेतमालाचा काटा करताना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय सुटीच्या दिवशीही आलेल्या सोयाबीनचा हर्रास करण्यात आला.
लिलाव प्रक्रियेत व्यत्यय येऊ नये म्हणून रोटेशन पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे. ओटा पध्दतीचा अवलंब केला जात आहे. यामुळे शेतकºयांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.

शेतमालावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा
प्रत्येक ओट्यावरील सोयाबीन सुरक्षित ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. या सीसीटीव्हीला संचालकांच्या अ‍ॅपसोबत जोडण्यात आले आहे. यामुळे कुठे गोंधळ उडाल्यास तत्काळ माहिती होणार आहे. कुठल्या सूचना द्यायच्या राहिल्यास त्यावरून तत्काळ देता येणार आहे.

जेवणासाठीही अतिरिक्त पास
सध्या निर्माण झालेल्या स्थितीवर मात करण्यासाठी जैन ट्रेडिंग कंपनीने शेतकऱ्यांना थंडीपासून सुरक्षा देण्यासाठी ब्लँकेट पुरविले आहे. तर भोजनाची व्यवस्था अपुरी पडू नये आणि माफक दरात भोजन मिळावे म्हणून अतिरिक्त पास गर्दीत वितरित करण्यात आल्या आहे. एकूणच कामकाजामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

Web Title: Blanket from the Market Committee for Local Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.