शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा ब्लॅक मार्च
By Admin | Updated: April 1, 2015 02:06 IST2015-04-01T02:06:39+5:302015-04-01T02:06:39+5:30
केंद्र सरकारने मान्य केलेल्या अभ्यासक्रमातील ओेबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, एसटी प्रवार्गातील विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती राज्य सरकारने रोखली.

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा ब्लॅक मार्च
यवतमाळ : केंद्र सरकारने मान्य केलेल्या अभ्यासक्रमातील ओेबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, एसटी प्रवार्गातील विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती राज्य सरकारने रोखली. विद्यार्थ्यांना तत्काळ शिष्यवृत्ती द्यावी या मागणीसाठी येथील जिल्हा कचेरीवर ओबीसी क्रांतीदलाच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी ब्लॅक मार्च काढला.
येथील महात्मा फुले चौकातून या ब्लॅक मार्चला प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी काळे फेटे बांधून हातात काळे झेंडे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला. काही विद्यार्थ्यांनी निषेधाच्या सूचना लिहिलेला पोशाख परिधान केला होता. विविध घोषणांनी परिसर दणाणला होता.
शैक्षणिक पंख छाटण्याचे काम राज्य सरकारने केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. १०० टक्के शिष्यवृत्ती लागु करण्यात यावी या मागणीसाठी हा ब्लॅकमार्च काढला होता. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्य सरचिटणीस अॅड. राजेंद्र माहाडोळे यांनी केले होेते. आंदोलनात जिल्हा सरचिटणीस जितेंद्र हिंगासपूरे, शोभा खडसे, विकास काळे, संजय पारधी, पद्माकर काळे, सुरेश चूनारकर, राजेश चौधरी, पिंटू बांगर, दिप्ती कडूकर, श्वेता देवतळे, अश्विनी चौधरी, विद्या डंभारे, अश्विनी तिजारे, सुनीता काळे, माया गोबरे यांच्यासह अनेकजन सहभागी झाले होते.
(शहर वार्ताहर)