शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

भाजपा पदाधिकाऱ्याचा आरटीओ चौकात खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:03 IST

येथील भाजपाच्या दलित आघाडी जिल्हा उपाध्यक्षाचा सावकारीच्या पैशाच्या वादातून निर्घृण खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नागपूर रोड स्थित आरटीओ कार्यालयाच्या समोर घडली.

ठळक मुद्देसावकारीच्या पैशाचा वाद : दोन्ही मारेकऱ्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील भाजपाच्या दलित आघाडी जिल्हा उपाध्यक्षाचा सावकारीच्या पैशाच्या वादातून निर्घृण खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नागपूर रोड स्थित आरटीओ कार्यालयाच्या समोर घडली. यातील मृतकाला यापूर्वी एका खुनाच्या घटनेत जन्मठेपेची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे, हे विशेष. खुनाच्या या घटनेमुळे यवतमाळातील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली.रितेश उर्फ बल्ली विलास बावीस्कर (२५) रा. पाटीपुरा यवतमाळ असे यातील मृताचे नाव आहे. त्याची आई फुलाबाई बावीस्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला. घटनेनंतर अवघ्या दोन तासात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दोन्ही आरोपींना स्मशानभूमी परिसरातील इंदिरानगरातून अटक केली. नईम उर्फ टमाटर खान वल्द गुलाबनबी खान (३२) रा. अलकबीरनगर यवतमाळ व नंदलाल उर्फ बंटी लाला दयाप्रसाद जयस्वाल (२९) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी यवतमाळ अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश उर्फ बल्ली याने आरोपीला व्याजाने पैसे दिले होते. या पैशासाठी तो सतत तगादा लावत होता. याच कारणावरून रात्री त्यांच्यात भांडण झाले. या भांडणाचा वचपा म्हणून रितेशच्या खुनाचा कट रचण्यात आला. रात्री ठरल्याप्रमाणे सकाळी त्याला आरटीओ कार्यालय परिसरात बोलविण्यात आले. तेथे येताच त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला गेला. जीव वाचविण्यासाठी तो गोदामाच्या परिसरात आश्रयाला गेला असता तेथेही त्याच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. यात रितेश मृत्यूमुखी पडला. घटनेनंतर मारेकरी तेथून पसार झाले. त्यांना स्मशानभूमी परिसरातील इंदिरानगरातून अटक करण्यात आली.रितेशकडून आरोपींनी ३० हजार रुपये उधार घेतले होते. त्यापेक्षा किती तरी रक्कम व्याजासह परत केली. मात्र आणखी पैशाचा तगादा रितेशकडून सुरू होता. शिवीगाळ, धमकी देणे असे प्रकारही केले जात होते. त्याच्याकडून पैशासाठी जीवाला धोका होण्याची भीती असल्याने आरोपींनी स्वत:च रितेशचा खून करण्याचा प्लॅन बनविला व तो अमलात आणल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते, जमादार अजय डोळे, सय्यद साजीद, पोलीस कर्मचारी वासू साटोणे, प्रदीप नायकवाडे, योगेश डगवार, रुपेश पाली, चालक अजय ढोले आदींनी आरोपींच्या अटकेची कारवाई केली.मृताला झाली होती खुनात जन्मठेपरितेश हा काही वर्षांपूर्वी झालेल्या अजय बन्सोड याच्या खुनात आरोपी आहे. त्याला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयाने त्याला या प्रकरणात सशर्त जामीन दिल्याचे पोलिसांनी सांगितले.दोनही आरोपी भाजी मंडीत कार्यरतरितेशचे मारेकरी हे येथील भाजी मंडीत मजुरीचे काम करतात. मृतक हा बाजारातून कमी व्याज दराने पैसा उचलायचा व तो जादा व्याज दराने मार्केटमध्ये फिरवायचा. अखेर या पैशाच्या वादातूनच रितेशचा खून झाला.भाजपातील नियुक्तीचा मृताने केला होता जल्लोषमृतक रितेश हा भाजपाच्या दलित आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष होता. आपल्या नियुक्तीच्या निमित्ताने दोन महिन्यापूर्वी त्याने भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत पाटीपुरा परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजनही केले होते. त्यानिमित्त शहरात सर्वत्र फ्लेक्स लावण्यात आले होते.

टॅग्स :Murderखून