भाजपा सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:58 IST2017-09-27T00:58:27+5:302017-09-27T00:58:54+5:30
केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे आमिष दाखवून सत्ता काबिज केली. परंतु सत्तेवर येताच या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला, ....

भाजपा सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे आमिष दाखवून सत्ता काबिज केली. परंतु सत्तेवर येताच या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला, असे प्रतिपादन काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले. सोमवारी येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
केळापूर-आर्णी विधानसभा मतदार संघातील महत्त्वाकांक्षी निम्न पैनगंगा प्रकल्प व पांढरकवडा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू करण्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर कोणताही प्रयत्न करीत नसल्याचा आरोप मोघे यांनी केला. यावेळी माजी नगराध्यक्ष शंकर बडे, विजय पाटील चालबर्डीकर, बाजार समितीचे सभापती प्रकाश मानकर, खविसंचे अध्यक्ष जितेंद्रसिंग कोंघारेकर, पंचायत समितीचे माजी सभापती रितेश परचाके, माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे, मनोज भोयर, जफर पटेल यांनी विचार व्यक्त केले. यावेळी हज यात्रा करून परत आलेले काँग्रेसचे बाबू बैलीम यांचा शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंचावर शंकरअण्णा नालमवार, जितेंद्र मोघे, भावेश बोरेले, करीम टेलर, अमर पाटील, शिनूअण्णा नालमवार, डच्चू सोखी, हफिज पोसवाल, भाऊ भोयर, प्रेमराव वखरे, सुरेश बेनवार, अशोक काळे उपस्थित होते.