कौटुंबिक वादात मोठ्या भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:43 IST2018-04-09T22:43:53+5:302018-04-09T22:43:53+5:30

कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने भोसकून खून करण्याची घटना घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा बु. येथे सोमवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

Big Brother's murder in the family dispute | कौटुंबिक वादात मोठ्या भावाचा खून

कौटुंबिक वादात मोठ्या भावाचा खून

ठळक मुद्देपांढुर्णा येथील घटना : चाकूने केले वार

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने भोसकून खून करण्याची घटना घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा बु. येथे सोमवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली.
कृष्णा पांडुरंग पवार (४५) असे मृताचे नाव आहे. तर लक्ष्मण पांडुरंग पवार असे आरोपीचे नाव आहे. दोघेही सख्खे भाऊ आहे. कौटुंबिक कलहातून त्यांच्यात वाद सुरू होता. या वादात सोमवारी पहाटे लक्ष्मणने कृष्णावर चाकूने हल्ला केला आणि चाकू रस्त्यात टाकून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून पकडले. या घटनेची माहिती घाटंजी पोलिसांना देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी समीर कोळी, ठाणेदार गणेश भावसार, पोलीस उपनिरीक्षक पुपुलवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच आरोपी लक्ष्मण पवार याला ताब्यात घेतले. चाकूही जप्त करण्यात आला. या घटनेची तक्रार कृष्णाची पत्नी छाया कृष्णा पवार हिने घाटंजी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास घाटंजी पोलीस करीत आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Big Brother's murder in the family dispute