भाग्यश्री नवटकेवर कारवाईसाठी भीम आर्मीचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 22:11 IST2018-12-05T22:11:19+5:302018-12-05T22:11:39+5:30
बीड जिल्ह्याच्या माजलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी अनुसूचित जातीविषयी केलेल्या वक्तव्याचा येथे भीम आर्मीतर्फे निषेध नोंदविण्यात आला. या अधिकाऱ्याला बडतर्फ करावे अशी मागणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

भाग्यश्री नवटकेवर कारवाईसाठी भीम आर्मीचे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बीड जिल्ह्याच्या माजलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी अनुसूचित जातीविषयी केलेल्या वक्तव्याचा येथे भीम आर्मीतर्फे निषेध नोंदविण्यात आला. या अधिकाऱ्याला बडतर्फ करावे अशी मागणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
भाग्यश्री नवटके या जातीयवादी मानसिकतेच्या आहे. त्यांनी द्वेषातून अॅट्रॉसिटीचा राग काढण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करतो, मारहाण करतो, असे वक्तव्य केले. ही बाब सोशल मीडियावर आली आहे. २३ लोकांना मारल्याची कबुली दिल्याने त्यांच्यावर कलम ३०७ नुसार गुन्हा नोंदवावा, अॅट्रॉसिटी दाखल करावा, बडतर्फ करावे, अशी मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास भीम आर्मीतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.
निवेदन देताना यवतमाळ शहर अध्यक्ष शुभम वासनिक, कुंदन मेश्राम, राजू गजभिये, सुमेध गजभिये, सुशांत गेडाम, शेखर हाडके, मंगेश मेश्राम, रोशन नाईक, संघर्ष फुले, इरफान शेख, प्रथम रोकडे, अंकुश पाटील, अजय मेश्राम, सुमित खडसे, आसिफ शेख, अजय तागडे, इसराईल शेख, प्रफुल्ल नेवारे, संयम फुलके, रवी खोब्रागडे आदी उपस्थित होते.