Bhardhaw Travels collided with a vertical container; Two killed, including driver | भरधाव ट्रॅव्हल्स उभ्या कंटेनरवर आदळली; चालकासह दोन ठार

भरधाव ट्रॅव्हल्स उभ्या कंटेनरवर आदळली; चालकासह दोन ठार

यवतमाळ: नेपाळवरून चेन्नईकडे मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स पांढरकवडालगत राज्य महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्सच्या चालकासह दोनजण ठार झाले, तर अनेक प्रवासी जखमी झाले. ही दुर्घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

जखमींपैकी एकाच्या पोटाला जबर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले, तर उर्वरित जखमींवर पांढरकवडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी व मृतांची नावे अद्याप कळू शकली नाही.

Web Title: Bhardhaw Travels collided with a vertical container; Two killed, including driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.