शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

फेसबुकवर अनोळखी सुंदरीने चॅटिंग केल्यास सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 5:00 AM

फेसबुकवर सुंदर मुलीचा फोटो वापरून अकाऊंट तयार केले जाते. यातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून अनेकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होतो. फोटोला पाहून फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणारे फसतात. पुढे मॅसेज चॅटिंग केली जाते. निवांत वेळेत हा चॅटिंगचा प्रकार सुरू राहतो. दोन दिवसांनंतर व्हिडिओ काॅलपर्यंत प्रकरण पोहोचते. व्हिडिओ काॅल केल्यानंतर पद्धतशीरपणे त्याचे स्क्रीन शाॅट किंवा स्क्रीन रेकाॅर्डिंग करून जाळ्यात ओढले जाते.

ठळक मुद्देमैत्रीचा हात पुढे करून केले जाते ब्लॅकमेल : व्हिडिओ चॅट रेकाॅर्डिंगचे माध्यम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ : समाज माध्यमातून फसवणुकीसाठी नवनवीन शकली लढविल्या जातात. कोरोना महामारीच्या संकटात हे फसवणूक करणारे अधिक सक्रिय झाले. फेक फेसबुक प्रोफाइल तयार करून संबंधित व्यक्तीसोबत मैत्री केली जाते. नंतर मैत्रीतून चॅटिंग व्हिडिओ काॅल हाही होतो. विशेष म्हणजे, संबंधितांकडून पैसा उकळण्यासाठी त्याला भावनिक साद घालून मजबूर केले जाते. ज्यांनी विरोध केला त्यांना थेट ब्लॅकमेलिंग केले जाते. त्यासाठी चॅटिंगचे स्क्रिन शॉट घेतले जातात. व्हिडिओचे स्क्रिन रेकाॅर्डिंग करून ठेवले जाते. या माध्यमातून संबंधित व्यक्तीला पैसे देण्यासाठी बाध्य करतात अथवा तो मजकूर इतरत्र व्हायरल करून समाजात बदनामी केली जाईल, असे चित्र निर्माण करण्यात येते. बदनामीच्या भीतीपोटी मागितलेली पैशांची रक्कम संबंधितांकडून देण्यात येते.

 असे ओढले जाते जाळ्यात

फेसबुकवर सुंदर मुलीचा फोटो वापरून अकाऊंट तयार केले जाते. यातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून अनेकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होतो. फोटोला पाहून फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणारे फसतात. पुढे मॅसेज चॅटिंग केली जाते. निवांत वेळेत हा चॅटिंगचा प्रकार सुरू राहतो. दोन दिवसांनंतर व्हिडिओ काॅलपर्यंत प्रकरण पोहोचते. व्हिडिओ काॅल केल्यानंतर पद्धतशीरपणे त्याचे स्क्रीन शाॅट किंवा स्क्रीन रेकाॅर्डिंग करून जाळ्यात ओढले जाते.

ही घ्या उदाहरणे

चॅटिंगचे फोटो दाखवून घातला जातो गंडाफ्रेंड रिक्वेस्ट पाठवून काही दिवस मैत्री केली जाते. बऱ्याचदा वैयक्तिक पातळीवरच्या बाबी शेअर करतात. यातून जवळीक निर्माण होते. नंतर काही दिवसांनी चॅटिंग केल्याचे फोटो दाखवून ब्लॅकमेल केले जाते.

मानसिक अस्थिरतेचा घेतात फायदाकुठल्याही कारणाने माणूस निराश असल्यास किंवा दैनंदिन कामकाजामुळे वैतागलेल्यांना हेरून त्यांच्या मानसिक अस्थिरतेचा फायदा घेतला जातो. अशा पद्धतीची फसवणूक करणारे वाढत आहेत.

स्क्रीन रेकाॅर्डिंगचा प्रकार धोकादायकव्हिडिओ काॅल करताना समोरची व्यक्ती नको त्या अवस्थेत राहून त्यात आपलाही सहभाग असल्याचे दर्शविते. काॅलसोबतच स्क्रिन शाॅट काढणे, चॅटिंगचे रेकाॅर्डिंग करणे असे प्रकार चालतात. यापासून प्रत्येकानेच सतर्क असणे आता गरजेचे झाले आहे.

अनोळखी फ्रेंड रिक्वेस्टपासून लांब रहा- सर्वात प्रथम प्रत्येकाने फेसबूक प्रोफाईलला टू स्टेप ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून सुरक्षित करावे. - यामुळे तुमच्या प्रोफाईलवरील फोटो, मॅसेजेस इतर व्यक्तींना दिसणार नाही. ते डाऊनलोड करता येणार नाही.- बहुतांश प्रकरणात फेक प्रोफाईलसाठी संबंधितांचे फोटो व नाव वापरले जाते.

फेक प्रोफाइल तयार करण्याचे प्रमाण वाढलेगेल्या काही दिवसांपासून बऱ्याच व्यक्तींचे फेसबुक अकाऊंट प्रोफाइल फेक बनवून यादीतील मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. नंतर पैशांची मागणी करण्यात येते. आपण अशी फेक प्रोफाइल स्वत: डिलिट करू शकतो. या माध्यमातून फसवणूक टाळता येते. प्रत्येकाने फसवणुकीची तक्रार देणे क्रमप्राप्त आहे.- अमोल पुरी,सायबर सेल

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFacebookफेसबुक