शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

पाण्याचे सर्वात चांगले नियोजन महाराष्ट्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 3:08 PM

पाण्याचा काटकसरीने वापर, पुनर्उपयोग, सांडपाणी व्यवस्थापन आणि जलपुनर्भरणात महाराष्ट्राचे काम देशात सर्वात चांगले आहे. तशी मोहर केंद्र सरकारने लावली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारची मोहर जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला प्रथम पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाण्याचा काटकसरीने वापर, पुनर्उपयोग, सांडपाणी व्यवस्थापन आणि जलपुनर्भरणात महाराष्ट्राचे काम देशात सर्वात चांगले आहे. तशी मोहर केंद्र सरकारने लावली आहे. सन २०१८ च्या सर्वोत्कृष्ट जलपुरस्कारासाठी महाराष्टष्ट्राची निवड झाली आहे. नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या हस्ते २५ फेब्रुवारीला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला सन्मानित केले जाणार आहे.देशातील सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशात जल क्षेत्राशी संबंधित विविध घटकांचे देश पातळीवर मूल्यांकन करून सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्याची परंपरा केंद्र सरकारने २००७-०८ पासून सुरू केली आहे. सन २०१८ च्या सर्वोत्कृष्ट जल पुरस्कारासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची निवड झाली आहे. जलसंपदा व पाण्याचे न्यायोचित, समसमान वितरण आणि व्यवस्थापनासाठी या प्राधिकरणाची स्थाापना झाली आहे. जागतिक बँकेची मदत व केंद्र सरकारच्या सहभागाने उभारले जाणारे प्रकल्प, सिंचन सुविधेतून निर्माण झालेल्या जलसंपदेचे शेती सिंचन, उद्योग, कारखाने, औष्णिक विद्युत प्रकल्प, स्थानिक स्वराज्य क्षेत्रात समसमान पेयजल वितरण व्यवस्था, नद्या व पाणी स्रोतांचे संपूर्ण व्यवस्थापन यासाठी हे प्राधिकरण कार्यरत आहे.या क्षेत्रात प्राधिकरणाने स्वायत्तपणे जनहितार्थ घेतलेले निर्णय व अंमलबजावणीचे होत असलेले सकारात्मक परिणाम याचा सर्वंकश विचार करून केंद्र सरकारने महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट जलनियमन प्राधिकरण म्हणून प्रथम पुरस्कारासाठी निवड केली आहे. पंतप्रधानासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्राला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी. बक्षी, अभियांत्रिकी सदस्य विनय कुळकर्णी, विधी सदस्य अ‍ॅड. विनोद तिवारी, अर्थ सदस्य डॉ.एस.टी. सांगळे, सचिव रसिकलाल चव्हाण हे हा सर्वोत्कृष्ट सन्मान स्वीकारणार आहे.महाराष्ट्र प्रथम पुरस्काराचे मानकरीसर्वोच्च न्यायालयाने पाण्याच्या अधिकाराला जीवन जगण्याचा मूलभूत-मौलिक अधिकार म्हणून संवैधानिक मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील प्राधिकरणाने महत्वपूर्ण आदेश पारित केले आहे. सर्वोत्कृष्ट जल पुरस्काराच्या निकषात महाराष्ट्रातील जलसंपत्ती प्राधिकरण सर्वच निकषावर सर्वोत्कृष्ट ठरल्याने देशातील सर्वोत्कृष्ट प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले आहे, अशी माहिती विधि सदस्य अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणी