शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
2
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
3
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
4
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
5
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
6
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
7
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
8
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
10
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
11
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
12
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
13
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
14
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
15
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
16
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
17
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
18
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
19
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
20
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?

कलामांची टुमदार अभ्यासिका वर्षभरानंतरही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 5:00 AM

गेल्या काही वर्षात जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र त्यातील अनेकांना पुणे, दिल्लीत जाऊनच अद्ययावत तयारी करावी लागत आहे. अशा विद्यार्थ्यांना यवतमाळातच अद्ययावत अभ्यासिका उपलब्ध व्हावी म्हणून नगरपरिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५ कोटी रुपये मंजूर केले. त्यातून तीन मजली आणि वातानुकूलित अशी टुमदार इमारत साकारण्यात आली. संगणक, इंटरनेट आणि पुस्तकांचा खजिना आणून ही अभ्यासिका सजविण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा अडसर : पाच कोटींचे दिमाखदार-वातानुकूलित बांधकाम वापराविना, विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

 अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. म्हणूनच यवतमाळात होतकरू विद्यार्थ्यांसाठी तब्बल ५ कोटी रुपये खर्चून कलामांच्या नावाने दिमाखदार अभ्यासिका बांधण्यात आली. मात्र वर्ष उलटूनही या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना आणण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.गेल्या काही वर्षात जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र त्यातील अनेकांना पुणे, दिल्लीत जाऊनच अद्ययावत तयारी करावी लागत आहे. अशा विद्यार्थ्यांना यवतमाळातच अद्ययावत अभ्यासिका उपलब्ध व्हावी म्हणून नगरपरिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५ कोटी रुपये मंजूर केले. त्यातून तीन मजली आणि वातानुकूलित अशी टुमदार इमारत साकारण्यात आली. संगणक, इंटरनेट आणि पुस्तकांचा खजिना आणून ही अभ्यासिका सजविण्यात आली आहे. पुस्तकप्रेमी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी नाव या अभ्यासिकेला देऊन ११ सप्टेंबर २०१९ रोजी लोकार्पणही करण्यात आले. विशेष म्हणजे, येथे केवळ होतकरू विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवडही केली. परंतु, आता आठ महिने लोटूनही या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत प्रत्यक्ष प्रवेश मिळू शकलेला नाही.जयंतीचा कार्यक्रमही नाहीडॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने ही अभ्यासिका साकारण्यात आली. अभ्यासिकेच्या लोकार्पणानंतर गुरुवारी पहिल्यांदाच डॉ. कलाम यांची जयंती आली आहे. विशेष म्हणजे हा दिवस ह्यवाचन प्रेरणा दिनह्ण म्हणून सर्वत्र साजरा होत असताना त्यांच्याच नावाची अभ्यासिका बंद आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे येथे विद्यार्थ्यांना प्रवेश नाही. तसेच जयंतीचा कार्यक्रम करण्याबाबतही वरिष्ठांचे निर्देश नसल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजय शिरसाट यांनी सांगितले.डॉ. कलामांनी यवतमाळात दिलेली ह्यतीह्ण पुस्तकभेटयवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालय परिसरातील विधी महाविद्यालयाच्या लोकार्पणासाठी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आले होते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चिक्कार गर्दी झाली होती. उंच मंचावर पाहुण्यांना येता यावे म्हणून रुंद रॅम्प उभारला होता. डॉ. कलाम रॅम्प चढत मंचावर आले. त्यांच्या हातात काही असल्याचे स्पष्ट जाणवत होते. तो पुस्तकांचा गठ्ठा होता. नियोजित जागेजवळ येताच त्यांनी टीपॉयवर ती पुस्तके ठेवली. उपस्थितांना हात उंचावून अभिवादन केले. उपस्थितांना संबोधित करण्यासाठी ते उभे राहिले. टाळ्यांचा कडकडाट झाला. परिसरातील कापूस, सोयाबीन या पिकांवर त्यांनी भाषणातून अभ्यासपूर्ण मत मांडताना ते मध्येच टीपॉयकडे गेले. पुस्तकांचा गठ्ठा उचलला आणि बाजूलाच बसलेल्या अमरावती विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरू डॉ. कमल सिंह यांना भेट दिला. विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी अन् परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही पुस्तके कामी पडतील, अशी पुस्तीही जोडली अन् नंतर पुढचे भाषण सुरू केले. राष्ट्रपतींच्या दिमतीला मोठा फौजफाटा असूनही कलामांनी पुस्तकांचा जड गठ्ठा स्वत: उचलावा, यावरूनच त्यांचे पुस्तकप्रेम यवतमाळकरांना पटले. 

 

 

टॅग्स :libraryवाचनालय