अस्वलाचा वृद्धावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 19:37 IST2020-03-30T19:37:04+5:302020-03-30T19:37:04+5:30

फुलसावंगी (यवतमाळ) : पायी जात असलेल्या वृद्धावर अस्वलाने हल्ला केला. सोमवारी सकाळी मोरचंडी ता. उमरखेड येथे घडलेल्या या घटनेत ...

The bear attacked the elderly person | अस्वलाचा वृद्धावर हल्ला

अस्वलाचा वृद्धावर हल्ला

फुलसावंगी (यवतमाळ) : पायी जात असलेल्या वृद्धावर अस्वलाने हल्ला केला. सोमवारी सकाळी मोरचंडी ता. उमरखेड येथे घडलेल्या या घटनेत नारायण डुकरे (५५) गंभीर जखमी झाले. 
नारायण डुकरे हे आपल्या नातवंडांना कोरटा येथे सोडून पायी परत येत होते. त्यावेळी कोरटा वनपरिक्षेत्रात त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. यात त्यांच्या हाताचे हाड तुटले आहे. एवढ्या जखमी अवस्थेतच ते चार किलोमीटर अंतर पायी आले. नंतर बेशुद्ध झाले. ही माहिती घरच्यांना कळताच वनरक्षक दीपककुमार गुडळे यांच्या मदतीने त्यांना फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले.

Web Title: The bear attacked the elderly person