शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

संभाव्य टोळधाड रोखण्यासाठी सतर्क रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 5:00 AM

या टोळधाडीचे थवे ताशी १२ ते १६ कि.मी. इतक्या वेगाने उडतात. या टोळ किडीचे थवे दूरवर उडून जात असल्याने अशा टोळधाडीपासून धोका असतो. ही किड तिच्या मार्गातील वनस्पतीची हिरवी पाने, ुफुले, फळे, बिया, फांदी, पालवी आदींचा फडशा पाडतात. वाळवंटी टोळ ही नाकतोड्याच्या गटातील टोळ आपल्याकडे आढळतात. वाळवंटी टोळ ही तांबूस रंगाची असते. ही अत्यंत खादाड व नुकसान करणारी कीड आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे आवाहन : वाळवंटी टोळधाडीपासून फळबागा वाचवा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेशात टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात या टोळधाडीचा प्रवेश झाला नसला तरी संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतक-यांना सतर्क राहून या टोळाधाडीचे नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.या टोळधाडीचे थवे ताशी १२ ते १६ कि.मी. इतक्या वेगाने उडतात. या टोळ किडीचे थवे दूरवर उडून जात असल्याने अशा टोळधाडीपासून धोका असतो. ही किड तिच्या मार्गातील वनस्पतीची हिरवी पाने, ुफुले, फळे, बिया, फांदी, पालवी आदींचा फडशा पाडतात. वाळवंटी टोळ ही नाकतोड्याच्या गटातील टोळ आपल्याकडे आढळतात. वाळवंटी टोळ ही तांबूस रंगाची असते. ही अत्यंत खादाड व नुकसान करणारी कीड आहे. एका टोळधाडीत असंख्य टोळ असतात. टोळामध्ये दोन प्रकारच्या स्थिती असतात. जेव्हा टोळांची संख्या खूपच कमी व विरळ असते तेव्हा त्या स्थितीत एकाकी स्थिती म्हणतात. अनुकूल हवामानात टोळांची संख्या खूप वाढते, त्याचे थवे तयार होतात व त्यांना भ्रमण करावेसे वाटते. हे थवे पुढे सरकत असतांना सायंकाळ झाल्यावर झाडा - झुडपामध्ये वस्तीत राहतात. पूर्ण वाढलेले थव्याचे स्थितीतील प्रौढ टोळ तांबूस रंगाचे असतात. एक चौरस किमी क्षेत्रावर जर टोळधाड असेल तर त्यामध्ये जवळ जवळ ३ हजार क्विंटल टोळ असतात. बाल्यावस्थेतील पिल्ले त्यांच्या वजनापेक्षा ६ ते ८ पटीने जास्त अन्न खातात. तांबूस टोळ पूर्णावस्थेत पोहचल्यावर पिवळ्या रंगाचे होतात. टोळधाडीने अद्यापपर्यंत यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश केलेला नाही मात्र शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. कृषी विभाग यासाठी सज्ज असून, शेतकऱ्यांनी दक्ष राहून टोळधाडी संदर्भात संबंधीत कृषी अधिकाºयांशी संपर्क करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.असे करावे नियंत्रणअंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास पिल्लांना अटकाव करून नियंत्रण करता येते. अंडी शोधून सामूहिकरित्या नष्ट करावीत. टोळांची सवय थव्या थव्याने एका दिशेने पळण्याची आहे. त्यामुळे पुढे येणाºया थव्याच्या वाटेवर ६० सेमी रुंद व ७५ सेंमी खोल चर खणून त्यात या पिल्लांना पकडता येते. संध्याकाळी, रात्रीच्या वेळी झाडाझुडपावर टोळ जमा होतात अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटून तसेच टायर जाळून धूर केल्याने नियंत्रण होते. थव्यांच्या स्थितीत पिल्लांची संख्या जास्त असल्यास निमतेल प्रति हेक्टरी २.५ लिटर फवारणी प्रभावी आहे. गहू किंवा भाताचे तूस यामध्ये फिफ्रोनील ५ एस. सी. व २.९२ ई.सी. व त्यामध्ये किडीस आकर्षित करण्यासाठी मळी मिसळून रात्री किडीने आश्रय घेतलेल्या झाडाच्या आजूबाजूस प्रति हेक्टरी २० ते ३० किलो या प्रमाणे फेकून द्यावे. जेणेकरून सदर आमिष खाल्यावर किडीचा मृत्यु होईल. मिथील परोथीआन २ टक्के भुक्टी २५-३०किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी. बेंडीओकार्ब ८२ डब्लू. पी, क्लोरोपायरीफोस २० ई.सी., डेल्टामेथ्रीन २.८ युएलव्ही या किटकनाशकांची टोळ नियंत्रणासाठी शिफारस केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने केली आहे. 

टॅग्स :agricultureशेती