आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 22:28 IST2018-05-05T22:28:08+5:302018-05-05T22:28:08+5:30
जाती-धर्माच्या नावाखाली राष्ट्राचे ऐक्य शक्य नाही. राष्ट्राची एकात्मता टिकविण्यासाठी तसेच आपला आत्मसन्मान वाढविण्यासाठी ओबीसी अल्पसंख्यांकांसह सर्व समाजबांधवांनी आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ रहावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी येथे केले.

आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ रहा
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : जाती-धर्माच्या नावाखाली राष्ट्राचे ऐक्य शक्य नाही. राष्ट्राची एकात्मता टिकविण्यासाठी तसेच आपला आत्मसन्मान वाढविण्यासाठी ओबीसी अल्पसंख्यांकांसह सर्व समाजबांधवांनी आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ रहावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी येथे केले.
उमरखेड येथील माहेश्वरी खुले नाट्यगृहाच्या प्रांगणात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त जिल्हा रिपब्लिकन सेनेच्यावतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष तातेराव हनवते होते. यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस संजीव बोधन, राज्य सरचिटणीस वसंत कांबळे, विदर्भ संघटक ताई ढोले, विदर्भ प्रमुख योगेश चवरे, जयकुमार चौरपगार, जिल्हा संघटक यशवंत कांबळे, अशोक खडसे, उमरखेड तालुका प्रभारी एम.डी. कोकणे, पुसद तालुका प्रमुख संजय इंगोले आदी उपस्थित होते. यावेळी कठुआ घटनेचा निषेध करून उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. सभेला मोठ्या संख्यने समाज बांधव उपस्थित होते.