बीडीओसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: September 30, 2015 06:12 IST2015-09-30T06:12:42+5:302015-09-30T06:12:42+5:30
इंदिरा आवास योजनेंतर्गत केलेल्या आॅनलाईन कामाचे बील काढण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना

बीडीओसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात
यवतमाळ : इंदिरा आवास योजनेंतर्गत केलेल्या आॅनलाईन कामाचे बील काढण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना यवतमाळ पंचायत समितीच्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मंगळवारी दुपारी सापळा रचून रंगेहात अटक केली. या प्रकरणात सहायक गटविकास अधिकाऱ्यालाही आरोपी करण्यात आले आहे.
सहायक गटविकास अधिकारी प्रकाश एस. नाटकर आणि लिपीक मोहसीन खान अली खान असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्यांची नावे आहे. तक्रारकर्त्याने केलेल्या आॅनलाईन कामाचे २७ हजार ९९० रुपये काढून देण्यासाठी चार हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यावरून सोमवारी तक्रार करण्यात आली. मंगळवारी सापळा रचला असता मोहसीन खान याला दोन हजार रुपये लाच घेताना पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात रंगेहात पकडण्यात आले. तसेच या प्रकरणात सहायक गटविकास अधिकारी नाटकर यांनाही आरोपी करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)