बॅटऱ्या चोरणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:00:30+5:30
चोरट्यांनी या बॅटऱ्यांनाच लक्ष केले असून याचा फटका कंपन्यांसह सामान्यांनाही बसत होता. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपींचा माग काढत वणीतून बॅटरी चोरणारी टोळीच जेरबंद केली. त्यांच्या गुन्ह्यांची पद्धत सर्वांनाच धक्का देणारी अशी आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वणीतील पथकाचे प्रमुख श्रीकांत जिंदमवार यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने या टोळीचा माग काढला. उमेश मडावी रा. वणी हा साथीदारांसह चंद्रपूरला जात असल्याची माहिती मिळाली.

बॅटऱ्या चोरणारी टोळी गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अनेक मोबाईल कंपन्यांचे जंगलात, शेतात मोबाईल टॉवर आहे. या ठिकाणी बॅकअपसाठी महागड्या बॅटरींचा वापर केला जातो. चोरट्यांनी या बॅटऱ्यांनाच लक्ष केले असून याचा फटका कंपन्यांसह सामान्यांनाही बसत होता. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपींचा माग काढत वणीतून बॅटरी चोरणारी टोळीच जेरबंद केली. त्यांच्या गुन्ह्यांची पद्धत सर्वांनाच धक्का देणारी अशी आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या वणीतील पथकाचे प्रमुख श्रीकांत जिंदमवार यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने या टोळीचा माग काढला. उमेश मडावी रा. वणी हा साथीदारांसह चंद्रपूरला जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून चारगाव चौकी परिसरात सापळा रचून या आरोपींना पकडले. त्यांच्याजवळ मोठे ट्रॅव्हलर वाहन होते. त्यामध्ये १२ बॅटऱ्या ६० हजार रुपये किंमतीच्या मिळाल्या. तत्काळ उमेश उत्तम मडावी रा. खरबडा मोहल्ला वणी, शिवा पांडुरंग गुरनुले रा. चिखलगाव, मारोती केशव मांदाडे रा. चिखलगाव यांना ताब्यात घेतले. या तिघांनी वडकी, आर्णी, घाटंजी, पारवा, मुकुटबन, पाटण, वणी येथून मोबाईल टॉवर बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. या बॅटºयांची खरेदी सलमान खान अमिरोद्दीन खान, मोहंमद आदिल खान मोमीन खान रा. मेरठ उत्तरप्रदेश यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याजवळून चंद्रपूर येथून ३५ बॅटऱ्या जप्त केल्या. अभय सुधाकर पचारे रा. वणी हा सुद्धा आरोपींसोबत चोरीचे काम करीत होता. या सर्व आरोपींकडून १८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कामगिरी एसपी एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात गजानन डोंगरे, उल्हास कुरकुटे, सुनील पाळेकर, किशोर झेंडेकर, पंकज बेले, प्रवीण कुथे यांनी केली.
अशी आहे चोरीची पद्धत
मोबाईल टॉवरची दुचाकीवरून दोघे जण रेकी करीत होते. नंतर टॉवर परिसरात येणाºया प्रमुख रस्त्यावर दोघे जण पाळत ठेऊन राहत होते. याच कालावधीत चारचाकी वाहन घेऊन बॅटºया काढून घेतल्या जात होत्या. या दरम्यान प्रत्यक्ष पाळत ठेवणारे व चोरी करणारे यांच्यात संपर्क होत होता. यावरूनच पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली. बॅटरी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.