अकोलाबाजार येथे गोठ्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 11:32 PM2020-05-10T23:32:06+5:302020-05-10T23:32:15+5:30

अकोला बाजार(यवतमाळ) : येथे शेख मन्नान शेख गणी यांचे शेतात धु-याला मोठ्या प्रमाणात आग लागली. शेतात धु-यावर ठेवुन असलेल्या ...

Barn fire at Akolabazar | अकोलाबाजार येथे गोठ्याला आग

अकोलाबाजार येथे गोठ्याला आग

Next

अकोला बाजार(यवतमाळ) : येथे शेख मन्नान शेख गणी यांचे शेतात धु-याला मोठ्या प्रमाणात आग लागली. शेतात धु-यावर ठेवुन असलेल्या प-हाट्या पेटल्याने आगीच्या ज्वाला  मोठ्या प्रमाणात निघत आहे .

आग लागलेल्या शेताचे बाजुला रस्त्यालगत पेट्रोल पंप व इंडेन गॅस एजन्सी चे गोडाउन व दुकान आहे .गावात सायंकाळी 7.30 वाजेपासुन जोरदार वादळ सुरू आहे. विजपुरवठा खंडीत झाला .वादळ सुरूच असल्यामुळे बाजूला असलेल्या पेट्रोल पंप व गॅस दुकानाला धोका होण्याची शक्यता आहे .आगीची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली .घाटंजी व यवतमाळ येथुन अग्नी शामक दलाच्या गाड्या निघाल्या असल्याचे सांगण्यात येते. वादळाची दिशा पलटली तर आगीच्या झोताने पेट्रोल पंप व गॅस दुकान आगीच्या विळख्यात येऊ शकते . सध्या नागरिक  माती टाकून कसेतरी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

घाटंजीहुन अग्नी शामक दलाची गाडी आली .आग विझविण्याचे काम सुरू आहे. ही आग शार्ट सर्कीटने लागल्याचे सांगण्यात येते . वादळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अग्नी शामक दलाने आग आटोक्यात आली असली तरी वादळामुळे आगीचा वाढण्याचा धोका कायम आहे .

Web Title: Barn fire at Akolabazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग