शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

४५ हजार शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीस

By admin | Updated: February 13, 2017 01:13 IST

जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे १२०० कोटी रूपयांचे कर्ज थकले आहे. त्यातील ४५ हजार शेतकऱ्यांकडे मोठ्या रकमेची थकबाकी आहे.

१२०० कोटींची थकबाकी : मालमत्ता जप्तीची कारवाई रूपेश उत्तरवार  यवतमाळ जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे १२०० कोटी रूपयांचे कर्ज थकले आहे. त्यातील ४५ हजार शेतकऱ्यांकडे मोठ्या रकमेची थकबाकी आहे. अशा शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने कर्ज वसुलीची नोटीस बजावली आहे. या शेतकऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत कर्जाची परतफेड न केल्यास, त्यांची गहाण असलेली मालमत्ता जप्त होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यामुळे राज्य शासनाने थकित कर्जाचे पुनर्गठन केले. यानंतरही थकबाकीदार शेतकऱ्यांना थकित कर्जाचा हप्ता भरता आला नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हातात कर्ज वसुलीची नोटीस पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अवसानच गळाले आहे. उत्तम आणेवारी असल्याचा अहवाल महसूल विभागाने राज्याकडे पाठविला. त्या अहवालाच्या आधारावर बँकांनी थकित कर्जाची वसुली सुरू केली आहे. कलम १०१ अंतर्गत १७, १८ आणि १९ नुसार ही कारवाई शेतकऱ्यांवर होणार आहे. या कलमांनुसार बँकांना शेतकऱ्यांची मालमत्ता जप्त करता येते. त्याचा लिलावही करता येतो. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दयनीय असतानाही ही कारवाई मोठ्या थकबाकीदार शेतकऱ्यांवर होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एक लाख ५८ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे १२०० कोटी थकित आहे. त्यापैकी ४५ हजार मोठे थकबाकीदार आहेत. त्यांना नोटीस बजावण्यात आली. मार्च अखेरपर्यंत कर्जाचा भरणा करा अथवा मालमत्ता जप्त होईल, अशी सूचना त्यांना देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कर्ज माफीच्या प्रस्तावाला केराची टोपली आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी कर्जमाफीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला. तीन लाख शेतकऱ्यांना साडे आठ कोटी रूपये कर्जमाफीसाठी लागणार होते. तसा प्रस्ताव राज्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर सहा अधिवेशन झाले. मात्र कर्जमाफीच्या विषयावर निर्णयच झाला नाही. राज्याकडे पाठविलेला प्रस्ताव अद्याप धूळ खात आहे. जिल्हा बँकेला १२०० कोटींच्या थकित कर्जाची वसुली करायची आहे. आत्तापर्यंत केवळ दोन कोटी रूपयांच्याच थकित कर्जाची वसुली झाली. यामुळे थकित कर्जदार शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. - अविनाश सिंघम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक