अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:24 IST2018-10-11T12:21:10+5:302018-10-11T12:24:31+5:30
आर्णी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आर्णी शहरात गुरुवारी बंद पाळण्यात आला.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीत कडकडीत बंद
ठळक मुद्देगुंगीचे औषध देऊन केला होता अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: आर्णी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आर्णी शहरात गुरुवारी बंद पाळण्यात आला. संतप्त जमावाने रस्त्यावर टायर जाळून वाहतूक बंद केली होती. या मुलीवरील अत्याचाराचा व्हिडिओ बनवून पाच जणांच्या टोळक्याने सलग दोन महिने तिचे शोषण केले होते.
(सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत)