शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हा पुरस्कार जाहीर

By admin | Updated: April 16, 2017 01:05 IST

शासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हास्तरीय पुरस्कार घोषित झाले असून या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र दिनी १ मे रोजी होणार आहे.

महाराष्ट्र दिनी वितरण : पालकमंत्र्यांची घोषणा, शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी लिखाणयवतमाळ : शासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हास्तरीय पुरस्कार घोषित झाले असून या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र दिनी १ मे रोजी होणार आहे.बळीराजा चेतना अभियानाच्या जिल्हास्तरीय पुरस्काराची घोषणा पालकमंत्री मदन येरावार यांनी केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सदर पुरस्कार घोषित करण्यात आले. यशोगाथा सांगणारे, घडविणारे शेतकरी या घटकातील प्रथम पुरस्कार माणिक बाबाराव कदम (कळंब), द्वितीय अशोक वानखडे (उमरखेड) आणि तृतीय पुरस्कार केशव तुकाराम निमकर (कोठा ता.कळंब) यांना जाहीर करण्यात आला. प्रवचनकार, नाटककार, गायक, पथनाट्य, कीर्तनकार, व्याख्याते, रांगोळीकार, कृषी मेळावे या घटकातील प्रथम पुरस्कार दत्तात्रय देवराव मारकड महाराज (आर्णी), द्वितीय पंकज खंडूसिंग राठोड (वाशीम), नागोराव भूजंगराव मुळे महाराज (उमरखेड) यांना विभागातून तर तृतीय पुरस्कार गंगाधर घोटेकर (राळेगाव) यांना जाहीर झाला.वृत्तपत्रे नियतकालिकातून लिखाण करणारे, वृत्तपत्राचे स्तंभ लेखन या घटकातील प्रथम पुरस्कार दैनिक लोकमतचे उपसंपादक सुहास सुपासे आणि दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी अमोल ढोणे यांना विभागून देण्यात आला. द्वितीय पुरस्कार देशोन्नतीचे उपसंपादक संतोष पुरी आणि टाईम्स आॅफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी टी.ओ. अब्राहम यांना विभागून तर तृतीय पुरस्कार सकाळचे तालुका प्रतिनिधी शब्बीर खान आणि एबीपी माझा वृत्त वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी कपिल देवचंद श्यामकुंवर यांना विभागून जाहीर करण्यात आला. सामाजिक, सांस्कृतिक घटकातील प्रथम पुरस्कार राळेगाव येथील गुरूदेव सेवा मंडळ (अध्यक्ष-ज्ञानेश्वर मुडे) या संस्थेला तर द्वितीय स्वर जीवन सांस्कृतिक कला व बहुद्देशीय संस्था घाटंजी (अध्यक्ष-प्रफुल्ल राऊत) तर तृतीय पुरस्कार प्रीती ग्रामीण विकास संस्था (अध्यक्ष-भीमराव महाराज) यांना जाहीर करण्यात आला. उत्कृष्ट काम करणाऱ्या शासकीय घटकातील प्रथम पुरस्कार तलाठी श्याम रणनवरे (आर्णी) यांना देण्यात येणार आहे.समस्यांच्या अनुषंगाने निराकरण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते लोकसेवक पंचायत राज संस्थेचे सदस्य या घटकातील प्रथम पुरस्कार डॉ.प्रवीण अ. गिरी (यवतमाळ), द्वितीय विशाल खांदणकर (वणी) तर तृतीय ग्रामस्तरीय समिती (शेंबाळपिंपरी) यांना जाहीर करण्यात आला. पुरस्कारांची घोषणा करण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)‘लोकमत’चे सुहास सुपासे यांना प्रथम पुरस्कारबळीराजा चेतना अभियानाअंतर्गत उत्कृष्ट लिखाणासाठी दिला जाणारा पुरस्कार लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालयातील उपसंपादक सुहास कालिदास सुपासे यांना जाहीर झाला आहे. सुपासे यांनी बळीराजा चेतना अभियानांतर्गत विकासात्मक लेखण करून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या लिखाणाची दखल घेत त्यांना प्रथम पुरस्कार घोषित केला.